धोनीचा IPL मधील प्रवास संपला? त्या Video ने चाहत्यांचा काळजात पाणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरू कडून पराभव पत्करावा लागल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. यंदाची आयपीएल ही महेंद्रसिंघ धोनीची शेवटची आयपीएल असेल अशा चर्चा आयपीएल सुरु होण्यापूर्वीच सुरु होत्या, त्यामुळे धोनीसाठी तरी यावेळी आयपीएल जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र कालच्या पराभवानंतर हे स्वप्न आता स्वप्नच राहिले असून धोनी पुढच्या वर्षी खेळताना दिसेल कि नाही याबाबत चाहत्यांच्या मनात शंका आहेत. त्याच दरम्यान, इंडियन प्रीमिअर लीगच्या ट्विटर हॅन्डल वरील धोनीचा एक विडिओ व्हायरल होत असून त्यामुळे चाहत्यांच्या काळजाचे मात्र पाणी पाणी झालं आहे.

काय आहे विडिओ मध्ये –

आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओत महेंद्रसिंह धोनीचा आवाज ऐकायला मिळतोय. देशाच्या कानाकोपर्यातील सर्वच स्टेडियममध्ये धोनीचे स्वागत चाहत्यांनी कशा प्रकारे केलं ते या व्हिडिओत सुरुवातीला दाखवण्यात आलंय. या व्हिडिओत धोनी मागच्या आयपीएल मध्ये काय बोलला ते सुद्धा दाखवण्यात आल आहे. धोनीनं त्यावेळी म्हटलेलं की,” परिस्थितीनुसार तुम्ही पाहत असाल तर माझ्या निवृत्तीची घोषणा करण्याची सर्वात योग्य वेळ आहे. मात्र, या वर्षी मी जिथं असेन, मला जितकं प्रेम आणि स्नेह मिळाला, त्यानुसार मला खूप खूप धन्यवाद म्हणनं सोपं आहे. मी परत येईन, आयपीएलचा कमीत कमी एक हंगाम खेळेन, माझ्याकडून हे एक गिफ्ट प्रमाणं असेल. ज्या प्रकारे चाहत्यांनी प्रेम आणि स्नेह दाखवलं त्यानुसार मला त्यांच्यासाठी काही तरी करण्याची गरज आहे. मला वाटत हा माझ्या करिअरचा अखेरचा टप्पा आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी काही वेळ डगआऊटमध्ये उभा राहिलो.

दरम्यान, धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नईचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनी मोठं विधान केलं आहे. प्रत्येकजण धोनीच्या भविष्याबाबत विचारत आहे हा शुद्ध वेडेपणा आहे. धोनीला माहित आहे की तो काय करणार आहे. मला माहीत आहे की या वर्षी मी त्याला प्री-टूर्नामेंट कॅम्पपासून बॉल मारताना पाहिले आहे. त्यामुळे तो चांगला खेळत असून तो निर्णय घेईल. पण जेव्हा मी भारतासोबत होतो आणि आता CSK सोबत होतो तेव्हा तो नेहमीच एक विलक्षण व्यक्ती होता. तो एक अविश्वसनीय क्रिकेटर असून त्याला खेळाची चांगली समज आहे.