न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झेप घेतली नाही त्याचं अजूनही दुःख, महेंद्रसिंग धोनीचा भावनिक खुलासा..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | स्वप्न आणि सत्य यामधील अंतर केवळ काही इंचाचं असलं तर ते दुःख आयुष्यभर न विसरता येण्यासारखं असतं. सहसा कोणत्याही वेगवान धावपटूच्या बाबतीत आपण हे नक्कीच म्हणू शकतो. असाफा पॉवेल, जस्टीन गटलीन, उसेन बोल्ट यांच्यासारख्या धावपटूंनी हे दुःख अनेकदा अनुभवलंही आहे. मात्र क्रिकेटच्या दुनियेत काही इंचांनी स्वप्न भंगल्याची दोन उदाहरण २०१९ च्या विश्वचषकात पहायला मिळाली. एक होतं भारताच्या महेंद्रसिंग धोनीचं आणि दुसरं न्यूझीलंडच्या मार्टिन गपटीलचं.

धोनी शेवटपर्यंत खेळला तर भारत जिंकणारच ही ९९ टक्के खात्री बाळगणाऱ्या भारतीय प्रेक्षकांसाठी न्यूझीलंडच्या सेमिफायनल सामन्यात धोनी धावबाद होणं हे चांगलंच जिव्हारी लागणारं होतं. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी प्रयत्नांची शिकस्त करून अवघड वाटणारा विजय आवाक्यात आणला होता. मात्र त्या रन-आउटने सगळंच होत्याचं नव्हतं केलं.

२०१९ विश्वचषक हा महेंद्रसिंग धोनीचा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक असल्याचं मानलं जात होतं. म्हणूनच धोनीनेही “त्यावेळी धाव पूर्ण करण्यासाठी झेप न घेतल्याचं अजूनही दुःख होत असल्याचं सांगितलं आहे. रनआऊट झालो नसतो तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता असं सांगत धोनीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि खिलाडूवृत्ती अंगी असलेल्या महेंद्रसिंग धोनीसाठी विश्वचषक जिंकणं हे कधीच अंतिम ध्येय नव्हतं. तो शांत डोक्याने खेळत राहिला, निर्णय घेत राहिला आणि खेळाचा आनंद लुटत राहिला. एवढं असलं तरी…त्या २ इंचाची उणीव धोनीला कायम सलत राहील एवढं मात्र खरं..