हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली.धोनीच्या निवृत्तीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
Indian cricketer Mahendra Singh Dhoni announces retirement from international cricket. pic.twitter.com/3UwE6ZXfK6
— ANI (@ANI) August 15, 2020
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये महेंद्रसिंग धोनीने शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. हा विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना होता ज्यामध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यानंतर धोनी क्रिकेट आणि भारतीय संघापासून दूर होता. विश्वचषक स्पर्धेपासूनच धोनीचे भविष्य आणि त्याच्या निवृत्तीबाबत अनेकदा अटकळ बांधले जात होते.अखेर आज धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.