MSRTC : शिवशाहीचे रूपांतर हिरकणी बसमध्ये!! राज्य परिवहन मंडळाचा निर्णय

MSRTC Shivshahi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एकेकाळीची लोकप्रिय आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी शिवशाही AC चे रूपांतर आता नियमित हिरकणी बस मध्ये करण्यात येत आहे. या पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरु झाली असून सर्व शिवशाही AC बसचे हिरकणी बस मध्ये रूपांतर करण्यासाठी किमान २ वर्ष लागतील असं बोललं जात आहे.

काही वर्षापसून शिवशाही बसमध्ये तांत्रिक समस्या- MSRTC

खरं तर जेव्हा सुरुवातीला २०१७ मध्ये शिवशाही बस महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सेवेत आली तेव्हा सर्वसामान्यांना या बसची अक्षरशः भुरळ पडली होती. आतमध्ये AC ची सुविधा आणि आरामदायी सीट उपलब्ध असल्याने अनेक प्रवासी सध्या लालपरीला सोडून शिवशाहीने प्रवास करण्यास प्राधान्य द्यायचे. शिवशाही बसच्या किमती या इतर बसगाड्यांच्या तुलनेत महाग असल्या तरी लोकांची पसंती राहायची. परंतु मागील काही वर्षापसून शिवशाही बस मध्ये अनेक तांत्रिक समस्या बघायला मिळाल्या. अनेकदा शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याच्या, बसला आग लागल्याच्या आणि अपघात झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे शिवशाहीचे रूपांतर हिरकणी बस मध्ये करण्याचा प्लॅन राज्य परिवहन मंडळाने (MSRTC) आखला.

त्यानुसार, आता काही शिवशाही बसचे रूपांतर हिरकणी बस मध्ये करण्यात आलं आहे. या नव्या हिरकणी बसेस पुढच्या आठवड्यापासून प्रवाशांच्या सेवेत येतील असं बोललं जातंय. तर इतर सर्व बसगाड्यांचे रूपांतर करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे दोन वर्षे लागतील,” असे राज्य वाहतूक संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या सात बसगाड्यांचे रूपांतर होण्याच्या प्रक्रियेत आहेत. “त्या बदलल्यानंतर, त्या काही काळासाठी तपासणीसाठी चालवल्या जातील. सध्या शिवशाहीच्या ताफ्यात एकूण ७९० बसेस आहेत आणि त्या सर्व टप्प्याटप्प्याने नियमित बसेसमध्ये बदलल्या जातील. या वर्षाच्या अखेरीस, सुमारे ४०-४५ शिवशाही बसेस हिरकणी बसेसमध्ये बदलण्याची अपेक्षा आहे.