AED 2022 मध्ये मुकेश अंबानी म्हणाले -“2030 पर्यंत आशिया जगाच्या अर्थव्यवस्थेत 60 टक्के योगदान देईल”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पुण्यात सुरू असलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग 2022 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल अतिशय सकारात्मक विधान केले. ते म्हणाले की,”2020 मध्ये भारताने उर्वरित जगाच्या आर्थिक विकासाचा दर ओलांडला आहे.”

पीआयसीचे अध्यक्ष रघुनाथ माशेकर यांच्याशी झालेल्या संभाषणात ते म्हणाले की,”भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग जगात सर्वात वेगवान आहे. आपल्याकडे जगातील सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ आहे. जगातील 60 टक्के लोकसंख्या आशियामध्ये राहते. यासह 2030 पर्यंत जगाच्या अर्थव्यवस्थेतील आशियाचे योगदान 60 टक्क्यांवर पोहोचेल. त्याचबरोबर पुढील दशकात भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.”

आशियाचा दबदबा वाढतो आहे
मुकेश अंबानी म्हणाले की,”जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया आणि विशेषतः भारताचा वाटा वाढत आहे. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत आशिया हे आकर्षणाचे केंद्र आहे आणि त्याचे वर्चस्व सातत्याने वाढत आहे. 2020 मध्ये कोरोना महामारीने प्रभावित होऊनही आशियाई देशांचा जीडीपी संपूर्ण जगात सर्वाधिक राहिला आहे. आज डेमोग्राफी आणि डेव्हलपमेंटमध्ये चांगला ताळमेळ आहे.”

ही परिषद तीन दिवस चालणार आहे
पुणे इंटरनॅशनल सेंटर पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग 23 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत चालणार आहे. या वेळी परिषदेची थीम पोस्ट-पँडेमिक वर्ल्ड इन रेझिलिएंट ग्लोबल ग्रोथ अशी ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज साथीच्या आजारातून सावरलेल्या जगासमोरील आव्हानांवर चर्चा करत आहेत.

यावेळी आशिया इकॉनॉमिक डायलॉग (AED 2022) मधील मुख्य चर्चा जागतिक व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील कोविड-19 च्या प्रभावावर असेल. यासोबतच कोविड-19 च्या आशियावरील प्रभावाला सामोरे जाण्याच्या मार्गांवरही चर्चा केली जाईल. औद्योगिक क्षेत्रातील बड्या चेहऱ्यांसह अनेक मोठे जागतिक नेतेही या परिषदेत सहभागी होत आहेत.

Leave a Comment