Mukhyamantri Tirth Darshan Yojana | राज्यात सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. आणि नागरिक या योजनांचे स्वागत देखील करतात. परंतु सध्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय होत आहे. या योजनेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार देखील चालू आहे. अशातच आता सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) सुरू केलेली आहे. आणि या योजनेसाठी देखील नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
सरकारच्या या योजनेअंतर्गत आता राज्यातील सर्व धर्मीयांमधील जेष्ठ नागरिक जे 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहे. आणि ज्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आहे. ती इच्छा आता मुख्यमंत्री पूर्ण करणार आहेत. यासाठी सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) राबवली आहे. या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 11 जुलै रोजी मान्यता देखील देण्यात आलेली आहे. या योजनेनुसार आता अर्जदारांना सुधारित निकनुसार ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे 31 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सरकारने या योजनेचा नवीन शासन निर्णय 11 ऑगस्ट रोजी जाहीर केलेला आहे. यासाठी आता आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी 31 जुलै 2024 आणि 5 ऑगस्ट 2024 यांनी सादर केलेल्या सर्व निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचारात घेतली होती.
सुधारित निकष | Mukhyamantri Tirth Darshan Yojana
- या योजनेचा अर्ज उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2024
- ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरता येणार आहे.
- या योजनेअंतर्गत कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे या लोकांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
लाभार्थ्यांची निवड
- या योजनेअंतर्गत प्रत्येक ठिकाणच्या प्रवाशासाठी जिल्हा निहायक कोण निश्चित केला जाणार आहे. यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या आधारित यादी तयार केली जाईल.
- जर पती आणि पत्नीने दोघांनी देखील या योजनेसाठी अर्ज केला असेल तर केवळ एकाची निवड या योजनेअंतर्गत होईल तर जिल्हास्तरीय समिती किंवा यात्रेही वर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.