Mukhymantri Vayoshri Yojana | जेष्ठ नागरिकांना सरकारकडून मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या अटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mukhymantri Vayoshri Yojana | आपले सरकार हे नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. नागरिकांच्या प्रत्येक अडचणीला केंद्रस्थानी ठेवून ते नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. सरकार हे शेतकरी, महिला त्याचप्रमाणे वृद्ध नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात. अशातच आता सरकारने आणखी एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या नागरिकांचे 65 वर्षे पूर्ण झालेले आहे त्यांना सरकारकडून 3000 रुपये अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhymantri Vayoshri Yojana ) असे आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य केले जाते. सरकारच्या समाज कल्याण विभागातून या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. ज्या व्यक्तींचे कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत आहे. अशा वयोवृद्ध व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी अर्ज देखील करू शकता.

वयोमानानुसार लोकांचे आजारपण वाढतात. त्या आजारपणासाठी त्यांना खर्च करता यावा. यासाठी ही योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत अशक्तपणावर उपाययोजना म्हणून आवश्यक ती साधने दिलेली जातात. तसेच योगा केंद्र, मनस्वस्थ केंद्र, शारीरिक स्वास्थ्य अबाधीत ठेवण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना आनंदाने जgता यावा यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात आलेली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाचे (Mukhymantri Vayoshri Yojana ) वय हे 65 वर्ष असणे गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांच्या आत असायला हवे. तसेच लाभार्थ्यांनी त्यांचे घोषणापत्र देखील सादर करणे गरजेचे आहे. पात्र असणाऱ्या नागरिकांच्या बँक खात्यात थेट 3000 रुपये वितरित केले जाणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत तुम्हाला जी आवश्यक उपकरणे खरेदी करायचे आहे. त्याचे प्रमाणपत्र देखील 30 दिवसाच्या आत सादर करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी कागदपत्र | Mukhymantri Vayoshri Yojana

  • आधार कार्ड
  • मतदान कार्ड
  • राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स
  • पासपोर्ट साइझ 2 फोटो
  • उत्पन्नाचं स्वयंघोषणापत्र
  • उपकरण किंवा साहित्याचा दुबार लाभ न घेतल्याचं स्वयंघोषणापत्र