हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. मुलायम सिंह यादव हे अनेक दिवसांपासून गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. डॉ.नरेश त्रेहान आणि डॉ.सुशीला कटारिया त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. 82 वर्षीय मुलायम सिंह यादव यांना युरिन इन्फेक्शनची समस्या आहे.
मुलायमसिंह यादव यांना जूनमध्ये गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत त्यांना हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तपासणीत त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाल्याचे आढळून आले.
वडीलांची प्रकृती खालावल्याची बातमी समजताच सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लखनौहून मेदांता रुग्णालयात पोहोचले आहेत. अपर्णा यादवही त्यांच्यासोबत रुग्णालयात जाण्याची शक्यता आहेत. शिवपाल यादव आणि अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव आधीच दिल्लीत आहेत.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी मुलायमसिंह यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. ते अन्नही खात नाही. त्यांना पाईपद्वारे लिक्विड आहार दिला जात आहे.