हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर मार्केटद्वारे आपल्याला भरपूर पैसे कमावता येतात. मात्र यासाठी योग्य शेअर्समध्ये पैसे लावणे महत्वाचे ठरते. कारण जर असे झाले नाही तर आपल्याला मोठे नुकसानही सोसावे लागू शकते. शेअर बाजारातील स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे मानले जाते. मार्केटमधील एक्सपर्ट्स सुद्धा गुंतवणूकदारांना अशा शेअर्सपासून दूर राहण्याचा नेहमी सल्ला देतात. कारण यामध्ये पैसे बुडण्याचा धोका जास्त असतो. मात्र जर एखाद्याने योग्य वेळी पैसे गुंतवले असतील तर त्याला अल्पावधीतच मोठा नफा मिळवता येऊ शकेल. Eyantra Ventures या कंपनीचे शेअर्स देखील असेच आहे.
3 रुपयांवरून 86 रुपयांवर पोहोचला
हे जाणून घ्या कि, शुक्रवारी Eyantra Ventures च्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट दिसून आले. यावेळी हे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढून 86.15 रुपयांवर बंद झाले. BSE वर 5 सप्टेंबर 2022 रोजी 3.43 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आज 90.45 रुपयांच्या पातळीवर आले आहेत. अशाप्रकारे गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सच्या किंमतींत 2411.66 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान गुंतवणूकदारांना लाखो रुपये मिळाले आहेत. Multibagger Stock
गुंतवणूकदार झाले मालामाल
जर एखाद्याने सहा महिन्यांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याच्या पैशांचे मूल्य 2411% वाढून ते 25 लाख रुपये झाले असते. हे जाणून घ्या कि, गेल्या महिन्याभरापासून हा साया शेअर्समध्ये सतत अप्पर सर्किट दिसून येत आहे. ज्यामुळे गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये 162.65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर एखाद्याने महिन्याभरापूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याच्या पैशांचे मूल्य 2.62 लाख रुपये झाले असते. Multibagger Stock
कंपनीबाबत जाणून घ्या
Eyantra Ventures ही जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमधील कंपनी आहे. या स्मॉल कॅप असलेल्या कंपनीची मार्केट कॅप 12.41 कोटी रुपये आहे. BSE वर गेल्या पाच दिवसांत ते 21.42 टक्क्यांनी वाढले आहेत. एका महिन्यात हे शेअर्स 162.65 टक्क्यांनी वाढले आहेत. शुक्रवारीच, या शेअर्सने गेल्या 52 आठवड्यांची हाय लेव्हल 86.15 गाठली आणि त्याची लो लेव्हल 3.43 रुपये आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सने जोरदार कामगिरी करत गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/eyantra-ventures-ltd/ey/512099/
हे पण वाचा :
Poco C55 : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये मजबूत फीचर्स असलेला ‘हा’ फोन भारतात लाँच
EPFO : EPS पेक्षा जास्त पेन्शन मिळण्याची संधी, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज
PNB ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! आता FD वर मिळणार 8% पेक्षा जास्त व्याज
SBI ‘या’ स्पेशल FD मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी !!!! घरबसल्या अशा प्रकारे करा अर्ज
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या