Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Score : सध्याच्या काळात क्रेडिट स्कोअर हा नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. याचा वापर करून, एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर पाहून त्याच्या कर्ज परतफेडीची संभाव्यता निश्चित करता येते. मात्र आजकाल बँका कर्ज देण्याआधी आपल्याकडे क्रेडिट स्कोअरची मागणी करतात. क्रेडिट स्कोअरला CIBIL स्कोअर असेही म्हंटले जाते. हे एक प्रकारचे रेटिंग आहे ज्याद्वारे आपण कर्ज फेडण्यात किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात किती गंभीर आहात हे कळून येते. जर आपण क्रेडिट कार्डचे बिल अथवा इतर कर्जे वेळेवर भरली नाहीत तर याचा परिणाम थेट आपल्या Credit स्कोअरवर परिणाम होतो. अशामुळे आपला Credit Score खराब होऊ शकेल. ज्यामुळे कदाचित बँका आपल्याला कर्ज देण्यास नकार देऊ शकतात. आजच्या या बातमीमध्ये आपण Credit स्कोअर म्हणजे काय आणि ते आपल्या आर्थिक कामांमध्ये कसा परिणाम करेल हे जाऊन घेउयात…

Seven ways to increase your CIBIL Score - NL Builders

हे जाणून घ्या कि, रेकॉर्डचे मूल्यमापन विविध क्रेडिट ब्युरोद्वारे केले जाते, जे स्कोअर पाठवतात. कर्मचार्‍यांच्या मूल्यांकनासाठी एक सिस्टीम आहे, जी एका विशिष्ट प्रकारच्या कॅल्क्युलेशनवर आधारित आहे. भारतातील पहिली क्रेडिट माहिती कंपनी, CIBIL (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड) ची स्थापना 2000 मध्ये झाली आणि ती यूएस-आधारित ट्रान्सयुनियनशी संलग्न आहे. यामुळे आपली आर्थिक परिस्थिती खरोखर कशी आहे आणि त्यावर आपले किती नियंत्रण आहे याची माहिती बँकेला कळू शकेल. Credit Score हा 3 अंकांमध्ये दाखविला जातो. जो 300 पासून सुरू होऊन 900 पर्यंत जातो.

How to check free CIBIL score - Naskar Financial Services

चांगला Credit स्कोअर म्हणजे काय ???

साधारणतः 750-900 चा Credit Score हा सर्वांत चांगला मानला जातो. यानंतर, 650-750 देखील चांगल्या Credit स्कोअरच्या श्रेणीत येतो. तसेच यानंतर येणार 550-650 चा Credit स्कोअर हा सरासरी श्रेणीत गणला जातो. तसेच शेवटी 300-500 चा Credit स्कोअर हा खराब श्रेणीत येतो. हे लक्षात घ्या कि, आपला Credit स्कोअर जितका चांगला असेल तितकाच आपल्याला स्वस्त आणि जलदरीतीने कर्ज मिळेल. जर आपला Credit स्कोअर खराब असेल तर कर्ज मिळवण्यात खूप त्रास सहन करावे लागेल.

What is a CIBIL Score? Why It Affects Personal Loan Application? | Bank of  Baroda

अशा प्रकारे केले जाते Credit Score चे कॅल्क्युलेशन

इथे हे जाणून घ्या कि, आपल्या क्रेडिट हिस्ट्रीच्या आधारे Credit स्कोअर तयार केला जातो. त्यासाठी गेल्या 36 महिन्यांची क्रेडिट हिस्ट्री पाहिली जाते. यामध्ये सर्व प्रकारची कर्जे, क्रेडिट कार्डचा खर्च, ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर इत्यादींचा समावेश असेल. यासोबतच यामध्ये आपण कसा खर्च केला आणि तो कसा भरला हे देखील पाहिले जाते.

Want to improve your credit score? Here are some tips

अशा प्रकारे तपासा Credit Score

यासाठी सर्वांत आधी CIBIL च्या वेबसाईटवर जा.
Get Your CIBIL निवडा.
यानंतर ईमेल आयडी, नाव आणि पासवर्ड टाका.
कोणताही आयडी प्रूफ सबमिट करा.
यानंतर पिन कोड, जन्मतारीख आणि फोन नंबर टाका.
Accept and Continue वर क्लिक करून पुढे जा.
मोबाईलवर आलेला OTP टाका क्लिक करा आणि पुढे जा.
आता डॅशबोर्डवर जाऊन आपला Credit स्कोअर तपासा.
आता व्हेरिफिकेशन केल्यानंतर Credit स्कोअर मिळेल.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.cibil.com/freecibilscore

हे पण वाचा :
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Train Cancelled : रेल्वेकडून 291 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
गेल्या 20 वर्षांत ‘या’ Multibagger Stock गुंतवणूकदारांना दिला 2900 पट रिटर्न
Vivo T1 44W : फक्त 2,250 रुपयांमध्ये घरी आणा Vivo चा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स