हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Multibagger Stock : गेल्या काही काळापासून शेअर बाजारात चढ उतार दिसून येत आहेत. यामध्ये काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी तर काही कंपन्यांच्या शेअर्स घसरण दिसून येत आहे. याशिवाय, बाजारात असेही काही स्टॉक आहेत जे गुंतवणूकदारांना सतत मोठा मिळवून देत आहेत. यातील अनेक शेअर्सनी गुंतवणुकदारांच्या पैशांत कित्येक पटींनी वाढ केली आहे.
आज आपण अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन या मल्टीबॅगर स्टॉकबाबतची जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या दोन वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवले आहेत. NSE वर 1 जानेवारी 2021 रोजी या कंपनीच्या शेअर्सची क्लोझिंग प्राईस 103.75 रुपये होती. यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्येही हळूहळू वाढ होताना दिसून येते आहे. Multibagger Stock
शेअर्समध्ये झाली जबरदस्त वाढ
जानेवारी 2022 मध्येच या शेअर्सची किंमत 400 रुपयांच्या पुढे गेली. यानंतर या शेअर्समध्ये मोठी तेजी येऊन ते 700 रुपयांच्या पातळीपर्यंत आले. मात्र, यानंतर काही काळासाठी यामध्ये घसरून होऊन ते 450 रुपयांपर्यंत खाली आले. मात्र, यानंतर या शेअर्सने पुन्हा भरारी घेत 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. Multibagger Stock
गुंतवणूकदारांच्या पैशांत केली 6 पट वाढ
NSE वर या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 746.20 रुपये आहे तर त्याचा गेल्या 52 आठवड्यांचा निच्चांक 405 रुपये आहे. आज (11 जानेवारी, 2023 रोजी) हे शेअर्स 605 रुपयांवर बंद झाले. अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांचे पैसे 6 पटीने वाढवले आहेत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/agarwal-industrial-corporation-ltd/agarind/531921/
हे पण वाचा :
देशातील ‘या’ बँका Fixed Deposits वर देत आहेत जबरदस्त रिटर्न, व्याजदर तपासा
एकाच सीरिअल नंबरच्या दोन नोटा असतील तर… जाणून घ्या त्यासाठीचे RBI चे नियम
Surya Nutan Solar Stove : महागड्या गॅसपासून मिळवा सुटका, घरी आणा सौरऊर्जेवर चालणारा ‘हा’ स्टोव्ह
Bank of Baroda च्या ग्राहकांना मोठा धक्का !!! आता कर्ज घेण्यासाठी मोजावे लागणार जास्त पैसे
Stock Tips : नवीन वर्षात ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून मिळवा मोठा नफा