Multibagger Stock : गेल्या 19 वर्षांत ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला मोठा रिटर्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच मोठा नफा मिळवण्याची अपेक्षा असते. शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. फार्मा कंपनी असलेल्या Divi’s Lab चे शेअर्स देखील मल्टीबॅगर स्टॉकच्या श्रेणीत मोडतात.19 वर्षांपूर्वी 9 रुपये किंमत असलेल्या हा शेअर 3613 रुपयांच्या पातळीवर आला आहे. यावेळी ज्यांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती ठेवली असेल तर आज ते करोडपती झाले असतील. Multibagger Stock

Divis Labs sheds 14% in two days, hits 52-week low post Q4 results | Business Standard News

मंगळवारी (30 ऑगस्ट रोजी) या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली. तो NSE वर 0.85 टक्क्यांच्या वाढीसह 3,613 रुपयांवर बंद झाला. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रात हे शेअर्स 3.41 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, गेल्या एक वर्षापासून हे शेअर्स 30 टक्क्यांनी घसरले आहेत. मात्र दीर्घ कालावधीत या शेअर्सने गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या शेअर्समध्ये 408 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock

Divis Laboratories Announces Rs 80 Crore Bonanza For Employees

कंपनीविषयी जाणून घ्या

हे लक्षात घ्या कि, लार्ज कॅप फार्मा कंपनी Divi’s Lab ची मार्केट कॅप 96,000.24 कोटी रुपये आहे. कंपनी Active Pharma Ingredients (APIs) बनवते. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत, Divi’s Lab चा निव्वळ नफा 702 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत ते 557 कोटी रुपये होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा (करासह) 4.5% ने वाढून 851 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ते 814 कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत Divi’s Lab च्या एकूण उत्पन्नात 17% वाढ झाली आहे. Multibagger Stock

Making more money is also a goal | Scripbox

1 लाख रुपयांनी 19 वर्षात 4 कोटी कमावले

13 मार्च 2003 रोजी Divi’s Lab चे शेअर्स 9 रुपयांवर होते. तर आज 30 ऑगस्ट 2022 रोजी या शेअर्सची किंमत 3613 रुपये आहे. जर एखाद्याने 19 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज त्याला 4.014 कोटी रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे, 5 वर्षांपूर्वी जर एखाद्याने या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 5.07 लाख रुपये मिळाले असते. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.divislabs.com/

हे पण वाचा :

EPFO च्या सदस्यांना आता डिजीलॉकरद्वारे डाउनलोड करता येतील ‘ही’ महत्त्वाची कागदपत्रे !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!

बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!

PM Kisan चा 12 वा हप्ता हवा असेल तर उद्यापर्यंत करावी लागेल eKYC, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये घसरण, आजचे नवीन भाव पहा