‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला 158 टक्के रिटर्न !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : National Oxygen Ltd. च्या शेअर्सने गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून दिला आहे. सोमवारी 11 जुलै रोजी त्यामध्ये प्रचंड वाढ झाली. या शेअर्समध्ये आज सुमारे 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. आज इंट्राडेमध्ये हे शेअर्स 114.30 रुपयांवर पोहोचले. चेन्नई मधील मोठ्या गुंतवणूकदार असलेल्या डॉली खन्ना यांनी जूनच्या तिमाहीत हे शेअर्स खरेदी केले आहेत. डॉली खन्ना यांनी हे शेअर्स खरेदी केल्याची बातमी बाहेर येताच गेल्या अनेक दिवसांपासून यामध्ये जोरदार वाढ पहायला मिळाली आहे.

fac-id-nig | Leeden National Oxygen Ltd

National Oxygen Ltd च्या प्राईसच्या हिस्ट्रीनुसार, या शेअर्सने बीएसईवर एका वर्षात 158 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या शेअर्सची गती मंदावली असून तो सुमारे 45 टक्क्यांनी खाली आला आहे. 2022 मध्ये हे शेअर्स 26 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात या शेअर्सने 15.11 टक्के रिटर्न इतका दिला आहे. Multibagger Stock

Dolly and Rajiv Khanna Success Story, इस दंपती ने शेयरों से कमाए करोड़ों  रुपये, जानिए दिग्गज निवेशक राजीव और डॉली खन्ना की दिलचस्प कहानी -  this-couple-earns-crores-of ...

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत नॅशनल ऑक्सिजन लिमिटेडच्या शेअरहोल्डिंगनुसार, डॉली खन्ना यांनी कंपनीतील 51,784 शेअर्स किंवा 1.08 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. जानेवारी-मार्च 2022 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांचे नाव नॅशनल ऑक्सिजन लिमिटेडच्याच्या वैयक्तिक शेअरहोल्डर्समध्ये नव्हते. Multibagger Stock

Gas manufacturing firm, CEO plead guilty over their part in 2015 fatal lab  fire in Jurong - TODAY

एका रिपोर्ट्सनुसार डॉली खन्ना यांनी अजंता सोया आणि टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. या दोन कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी वाढवली आहे. याशिवाय त्यांनी इतर सहा कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी केली आहे. मात्र त्यांनी या कंपन्यांमधील आपला हिस्सा एक टक्क्याच्या वर ठेवला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nolgroup.com/

हे पण वाचा :

Pm Kisan Samman Nidhi: ‘या’ लोकांना नाही मिळणार पैसे; तुम्ही पात्र आहात का ??

UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…

ITR भरताना करू नका ‘या’ 5 चुका !!! अन्यथा होऊ शकेल नुकसान

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण, नवीन दर पहा

Share Market : गेल्या 3 दिवसांत गुंतवणूकदारांना झाला 6.30 लाख कोटी रुपयांचा फायदा !!!