UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटीएम द्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी देशभरात कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना UPI च्या मदतीने एटीएममधून पैसे काढता येतील. यासाठी मशीनमध्ये एटीएम कार्ड घालण्याची गरज भासणार नाही. नवीन सुविधेला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) असे नाव देण्यात आले आहे. RBI ने सर्व बँकांना त्यांच्या ATM मध्ये ही सुविधा लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितले आहे.

UPI Tips: Now you can withdraw cash from ATM through UPI app, know the  method - FINAX NEWS

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI शी संबंधित एक नवीन सुविधा विकसित केली आहे. ज्यातर्गत एटीएम मशिनमध्ये कार्डलेस कॅश विथड्रॉवल इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला Google Pay, Paytm, PhonePe आणि इतर UPI Apps द्वारे पैसे काढता येतील. मात्र यासाठी आपला फोन सोबत असणे आवश्यक आहे. एटीएम द्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

rbi: Cardless cash in ATMs via UPI to be extended soon: RBI Governor Das,  BFSI News, ET BFSI

त्यासाठी किती शुल्क द्यावे लागेल ?

एका मीडिया रिपोर्टनुसार, UPI द्वारे एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क आकारले जाईल की ही सुविधा फ्री मध्ये उपलब्ध असेल याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. मात्र, आता RBI ने स्पष्ट केले आहे की, कोणतीही बँक UPI द्वारे पैसे काढण्यासाठी ग्राहकांकडून वेगळे शुल्क आकारू शकणार नाही. ही कार्डलेस सुविधा एटीएम, डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्यासारखीच असेल. याद्वारे एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकण्याची गरज नाही. यासाठी एटीएम स्क्रीनवर एक QR कोड दिसेल, जो फोनद्वारे स्कॅन करून पैसे काढता येईल. अशा परिस्थितीत कार्ड क्लोनिंग किंवा स्किमिंगसारखे धोके टाळता येतील.

Now you won't need debit card to withdraw money from ATM, here's why |  Personal Finance News | Zee News

अशा प्रकारे पैसे काढता येतील

सर्वांत आधी एटीएम मशीनमध्ये कॅश विड्रॉल ऑप्शन निवडावा लागेल.
यानंतर, एटीएम स्क्रीनवर कॅश विड्रॉल विथ UPI पर्याय निवडावा लागेल.
हे केल्यानंतर एटीएम मशीनच्या स्क्रीनवर QR कोड दिसेल.
स्मार्टफोनवरून हा QR कोड स्कॅन करून UPI App मध्ये काढायची रक्कम भरावी लागेल.
यानंतर स्मार्टफोनमध्ये UPI पिन टाकावा लागेल.
पिन टाकताच एटीएम मशीनमधून पैसे काढले जातील.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/NotificationUser.aspx?Id=12321&Mode=0

हे पण वाचा :

ITR भरताना करू नका ‘या’ 5 चुका !!! अन्यथा होऊ शकेल नुकसान

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर चांदीच्या दरात घसरण, नवीन दर पहा

Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार जास्त व्याज, नवे दर तपासा

Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू

Leave a Comment