Multibagger Stock : घसरत्या बाजारातही ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला 18 पट रिटर्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांमध्ये शेअर बाजार देखील आहे. याद्वारे गुंतवणुक करून मोठा नफा मिळवता येतो. मात्र त्यामध्ये तितकीच जोखीं देखील असते. शेअर बाजारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप सेगमेंट आहेत ज्यामधील अनेक कंपन्यांनी घसरत्या बाजारातही गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न मिळवून दिला आहे. यामध्ये Kernex Microsystems India या कंपनीचे नाव देखील सामील आहे. रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सुरक्षा उपकरणांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या गुंतवणूकदारांकडून मोठी गुंतवणूक केली जात आहे.

This multibagger stock hits upper circuit; zooms over 550% in one year - BusinessToday

आज (11 ऑक्टोबर रोजी) आज पुन्हा या कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ होऊन त्याची किंमत 344 रुपयांवर आली आहे. गेल्या दोन वर्षांत हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. यापूर्वी डिसेंबर 2005 मध्ये शेअरची किंमत 363 रुपये होती, जो विक्रमी उच्चांक आहे. Multibagger Stock

Post Office Scheme: Get Rs 4950 per month on your investment | Personal Finance News | Zee News

वर्षभरापूर्वी गाठली विक्रमी नीचांकी पातळी

या कंपनीच्या शेअर्सनी फक्त गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 18 पट नफा दिला आहे. 12 ऑक्टोबर 2020 रोजी 18.50 रुपये किंमत असलेल्या या शेअर्समध्ये आता 18.59 पटीने वाढ होऊन ते 344 रुपयांच्या पातळीवर आले आहे. आज वर्षभरापूर्वी 11 ऑक्टोबर 2021 रोजी हे शेअर्स 78.60 रुपयांच्या एका वर्षातील नीचांकी पातळीवर होता. Multibagger Stock

गेल्या महिन्यात केर्नेक्स मायक्रो सिस्टिम्स कडून स्टॉक एक्सचेंजला कळवण्यात आले होते की,” उत्तर मध्य रेल्वेने 254.86 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत केर्नेक्स-केईसी कन्सोर्टियमला ​​स्वीकृती पत्र जारी केले आहे. या प्रकल्पांतर्गत गाड्यांमधील टक्कर टाळण्यासाठी कवचची तरतूद केली गेली आहे. याशिवाय, कंपनीकडून लवकरच दक्षिण मध्य रेल्वेसोबतही असाच करार केला जाणार आहे. Multibagger Stock

Indian Rupee won't keep up a strong start to 2022, says ICICI Bank | Mint

रेल्वेकडून सुरक्षा उपकरणांच्या मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता

आता भारतीय रेल्वेकडूनही सर्व गाड्यांसाठी कवच ​​लागू करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांत आधी चार महानगरांना जोडणाऱ्या मार्गांवर केले जाणार आहे. या ‘कवच’ सिस्टीममध्ये हाय फ्रेक्वेंसी रेडिओ कम्युनिकेशनचा वापर केला जातो. ज्याअंतर्गत, लगतच्या रुळांवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच किलोमीटरच्या सर्कलमध्ये असलेल्या सर्व गाड्या थांबतील. या ‘कवच’ ला 160 किमी प्रतितास वेगासाठी डिझाइन केले गेले आहे.

2022 च्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालात केर्नेक्स मायक्रो सिस्टीम्सने म्हटले की, रेल्वे बोर्डाकडून सर्व झोनला कवचसाठी दिलेल्या निविदा काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आतापर्यंत 3 हजार किमीच्या 1500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी 10 निविदा जारी केल्या गेल्या आहेत. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kernex.in/

हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Jio च्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसहित मिळवा 2.5GB डेटा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा