हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. Page Industries Ltd या कंपनीचे शेअर्स देखील गुंतवणुकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या 15 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना जवळपास 19,900% रिटर्न मिळवून दिला आहे. आजही पेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांनी वाढ होऊन ते 54,000 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये यामध्ये 6 टक्क्यांहून जास्तीने वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.
पेज इंडस्ट्रीज लिमिटेड बाबत बोलायचे झाल्यास ही कंपनी इनरवेअरचे प्रोडक्शन आणि रिटेल सेल्समध्ये गुंतलेली आहे. या कंपनीकडे भारत, ओमान, कतार, मालदीव, भूतान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातीमधील जॉकी इंटरनॅशनलचे स्पेशल लायसन्स आहे. तसेच भारतातील स्पीडो ब्रँडचे प्रोडक्शन, मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्यूशनसाठीचे देखील स्पेशल लायसन्स या कंपनीकडे आहे.
2007 मध्ये झाली लिस्टिंग
हे जाणून घ्या कि, मार्च 2007 मध्ये पेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सची 270 रुपयांवर लिस्टिंग झाली.गेल्या 15 वर्षांत त्यामध्ये 19,900% वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आज त्याची किंमत 52,954.00 प्रति शेअर इतकी झाली आहे. 2022 या आर्थिक वर्षांमध्ये आतापर्यंत या शेअर्समध्ये सुमारे 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock
2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत Page Industries Limited ने 207 कोटीचा नफा नोंदविला आहे. मागील वर्षी याच कालावधीत तो 10.9 कोटी रुपये इतका होता. तसेच, समीक्षाधीन तिमाहीत कंपनीच्या कामकाजातून मिळालेला महसूल 1,341 कोटी रुपये इतका होता. जो आर्थिक वर्ष 22 च्या पहिल्या तिमाहीच्या खालच्या आधारापेक्षा दोन पट जास्त आहे. Multibagger Stock
ही वाढ पुढेही सुरु राहील का ???
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 23 च्या पहिल्या तिमाहीत पेज इंडस्ट्रीजची टॉपलाइन स्ट्रीट अंदाजांसाठी चांगली ठरली कारण कंपनीच्या महसुलात जोरदार वाढ झाली होती. मात्र कापूस आणि पॅकिंग मटेरियलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने कंपनीचे एकूण मार्जिन अपेक्षेपेक्षा कमी होते. पोर्टफोलिओमधील वाढ आणि डिस्ट्रीब्यूशनच्या विस्तारामुळे कंपनीच्या सर्व उत्पादन कॅटेगिरीच्या विक्रीमध्ये जोरदार वाढ झाल्याचे पहायला मिळाले. Multibagger Stock
पेज इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) असलेले व्हीएस गणेश यांनी सांगितले कि, “आम्ही या आश्वासक बाजारपेठेत आमच्या उत्पादनांबाबत सकारात्मक दृष्टीकोन बाळगून आहोत. त्यांची किंमत, दर्जा, उत्पादनाचे डिझाईन आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या भक्कम आधारस्तंभांवर आधारित, आम्ही आमच्या ग्राहकांना प्रीमियम उत्पादनांची विस्तृत श्रेणी देत राहू.” Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/page-industries-ltd/pageind/532827/
हे पण वाचा :
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर
फक्त उद्यापर्यंतच घेता येऊ शकेल ICICI Bank च्या ‘या’ योजनेचा लाभ !!!
खुशखबर !!! SBI कडून झिरो प्रोसेसिंग फीसमध्ये अशा प्रकारे मिळवा लोन
‘या’ 5 Multibagger Stocks ने गुंतवणूकदारांना अल्पावधीतच मिळवून दिला मोठा नफा
PNB च्या ‘या’ स्पेशल ऑफर अंर्तगत ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 6.60% रिटर्न !!!