हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारातील स्नेक कंपन्यांचे शेअर्स हे मल्टीबॅगर म्हणून उदयास आले आहेत. मात्र असे म्हंटले जाते कि, शेअर बाजारातून पैसे कमवण्यासाठी संयम खूप महत्त्वाचा आहे. तसेच दीर्घ मुदतीसाठी मजबूत फंडामेंटल्स असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने मोठा नफा मिळतो. तसेच दीर्घकालावधीसाठी पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदाराला अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांपेक्षा जास्त फायदा मिळतो. हे फायदे गुंतवणूकदाराच्या रिटर्नच्या अनेक पटींनी वाढतात.
नवरत्न कंपनी Bharat Petroleum Corporation Ltd च्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनाही असाच फायदा मिळाला आहे. गेल्या 23 वर्षांत या मल्टीबॅगर स्टॉकने जबरदस्त रिटर्न दिला आहे. या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेल्या गुंतवणूकदारांना आज करोडो रुपये मिळाले आहेत. 2000 सालापासून आतापर्यन्त चार वेळा बोनस शेअर्स जाहीर करताना या कंपनीने भागधारकांना नियमितपणे लाभांश दिला आहे. जर एखाद्याने या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असती तर तो मालामाल झाला असता. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना मिळाले बोनस शेअर्स
BSE च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, BPCL ने अनुक्रमे 2000, 2012, 2016 आणि 2017 मध्ये बोनस शेअर्स जाहीर केले आहेत. या कंपनीने 20 डिसेंबर 2000 रोजी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यासाठी BPCL च्या शेअर्सचे एक्स-बोनस ट्रेडिंग झाले. त्याचप्रमाणे, 13 जुलै 2012 आणि 13 जुलै 2016 रोजी 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यासाठी एक्स-बोनस बिझनेस केला. पुन्हा 13 जुलै 2017 रोजी, BPCL च्या शेअर्सने 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करण्यासाठी एक्स-बोनस बिझनेस केला. Multibagger Stock
बोनस शेअर्सचा परिणाम
पहिल्या तीन 1:1 बोनस शेअर्समुळे, दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केलेल्यांच्या शेअरहोल्डिंगमध्ये 8 पटीने (2 x 2 x 2) वाढ झाली. त्यानंतर 2017 मध्ये या कंपनीने 1:2 बोनस शेअर्स घोषित केले, याचा अर्थ शेअरहोल्डिंग 50 टक्क्यांनी वाढली कारण कंपनीने शेअरहोल्डरकडे असलेल्या प्रत्येक दोन शेअर्समागे एक बोनस शेअर दिला. त्यामुळे, गुंतवणूकदाराचे शेअरहोल्डिंग 12 पट (8 x 1.5) होते. Multibagger Stock
BPCL च्या शेअर्सची हिस्ट्री तपासा
2000 च्या सुरुवातीस, या शेअर्सची किंमत सुमारे 20 रुपये प्रति शेअर होती. जर एखाद्याने त्यावेळी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला 5,000 शेअर्स मिळाले असतील. तसेच वर चर्चा केलेल्या चार बोनस शेअर्सनंतर या 5,000 शेअर्सची किंमत 12 पट वाढली असेल. याचा अर्थ असा की, 2000, 2012, 2016 आणि 2017 मध्ये बोनस शेअर्स जारी केल्यानंतर, एखाद्याच्या डीमॅट खात्यातील BPCL शेअर्सची एकूण संख्या 60,000 वर गेली असेल. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/bharat-petroleum-corporation-ltd/bpcl/500547/
हे पण वाचा :
व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी Telegram ने लाँच केले खास फीचर्स !!!
‘या’ Valentine’s Day Sale अंतर्गत iPhone 14 वर 30000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी !!!
खिशात एक पैसाही नाही मात्र Valentine’s Day ला जोडीदाराला चित्रपट दाखवायचा आहे, मग आजच करा ‘हे’ काम
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा
New Business Idea : दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत