हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्याच्या काळात जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. भू-राजकीय तणाव, जगभरातील वाढती चलनवाढ, परकीय गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि जागतिक मंदीची वाढती भीती या दरम्यान भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. मात्र असे असूनही काही स्टॉक गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आहेत. दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचे शेअर्स देखील याच कॅटेगिरीमध्ये येतात. 1 ऑगस्ट रोजी देखील या स्टॉकमध्ये जोरदार वाढ दिसून आली.
सलग दुसऱ्या सत्रात दीपक फर्टिलायझर्सच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या शेअर्सने आज आपला सर्वकालीन उच्चांक गाठला. हे शेअर्स आज 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 746.25 रुपयांवर बंद झाले. Multibagger Stock
एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या एक वर्षापासून दीपक फर्टिलायझर्सच्या शेअर्समध्ये वाढ होते आहे. या काळात या शेअर्सने गुंतवणूकदारांना 66 टक्के इतका रिटर्न दिला आहे. त्याचप्रमाणे, 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने गुंतवणूकदारांना 85 टक्के रिटर्न दिला आहे. 3 जानेवारी रोजी 403.15 रुपये किंमत असलेला हा शेअर आज 746.25 रुपयांवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअर्समध्ये 30.60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना या शेअर्सने 21 टक्के नफा दिला आहे. तर गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हे शेअर्स 11.18 टक्क्यांनी वाढले आहेत. Multibagger Stock
दीपक फर्टिलायझर्स ही देशातील आघाडीची औद्योगिक रसायने आणि खते बनवणारी कंपनी आहे. 2022 या आर्थिक वर्षच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होते आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीचे मार्जिन देखील प्रचंड वाढले आहे. मार्जिनच्या वाढीमध्ये केमिकल सेग्मेंटचा मोठा वाटा आहे. Multibagger Stock
या तिमाहीत केमिकल सेग्मेंटमधील महसूल दुपटीने वाढून 1,771 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत महसुलात 19 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी 2023 च्या पहिल्या तिमाहीत त्यामध्ये 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे वार्षिक आधारावर खताच्या महसुलात 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, ऑपरेटिंग EBITDA मार्जिन देखील आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत 24.3 टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत ही वाढ 15.2 टक्के होती. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dfpcl.com/
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार Netflix, Amazon Prime चे फ्री सबस्क्रिप्शन !!!
पेन्शनधारकांसाठी EPFO ने सुरू केली नवी सुविधा !!!
Bank of Baroda कडून पेमेंट्सशी संबंधित नवीन नियम आजपासून लागू !!!
ITR भरण्यासाठी PAN-Aadhaar Link असणे का महत्वाचे आहे ???
Hyundai Palisade 2022 : ह्युंदाईची ‘ही’ 7 सीटर SUV लवकरच बाजारात; पहा फीचर्स आणि किंमत