हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : 2022 या आर्थिक वर्षांत शेअर बाजारात खूपचा अस्थिरता होती. या काळात बाजारात प्रचंड चढ-उतार दिसून आले. 2022 मध्ये BSE सेन्सेक्समध्ये आतापर्यंत फक्त 2.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर निफ्टीदेखील फक्त 2.34 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, या कालावधीतही काही कंपन्यानाच्या शेअर्सनी आपल्या गुतंवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. Pondy Oxides and Chemicals या कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. 2022 मध्ये या शेअर्सने आतापर्यंत सुमारे 105 टक्के इतका रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
30 ऑगस्ट रोजीही या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. आज हे या शेअर्स 8.25 टक्क्यांनी वाढून 937.70 रुपयांवर बंद झाले. इंट्राडे मध्ये एकदा हे शेअर्स 950 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये तर या शेअर्समध्ये 27.20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीने आता गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देखील जाहीर केले आहेत. हे जाणून घ्या कि, या केमिकल कंपनीकडून आता 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले जातील. Multibagger Stock
वर्षभरात 123.44% रिटर्न
कंपनीने दिलेल्या माहिती नुसार या बोनस शेअर्सची एक्स-डेट 28 सप्टेंबर 2022 आहे. तर बोनस जारी करण्याची रेकॉर्ड डेट 29 सप्टेंबर 2022 आहे. कंपनीने याआधी देखील 15 जानेवारी 2007 रोजी 1:10 या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. हे लक्षात असू द्यात कि, गेल्या एका महिन्यात हे शेअर्स 40 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 68.29 टक्के तर गेल्या एका वर्षात 123.44% रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना केले मालामाल
BSE वर 27 मार्च 2009 रोजी या कंपनीचे शेअर्स 21.50 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते. तर 30 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीच्या शेअर्सनी 950 रुपयांचा उच्चांक गाठला. जर एखाद्याने मार्च 2009 रोजी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम 43.93 लाख रुपये झाली असती. तसेच जर एखाद्याने 1 वर्षापूर्वी पॉन्डी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 2,23,866 रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे, जर 2022 मध्ये एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही गुंतवणूक 209,599 रुपये झाली असती. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pocl.com/
हे पण वाचा :
SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या
शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!
सणासुदीच्या काळात Personal Loan घेणार असाल तर विविध बँकांचे व्याजदर तपासा !!!
Gold Price Today : सोन्याच्या दरात वाढ तर चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर तपासा !!!
Business Idea : पोस्ट ऑफिसद्वारे दरमहा चांगले पैसे कमावण्याची संधी !!!