हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : PVC आणि CPVC पाईप्सच्या उत्पादनातील Astral Limited हे प्रमुख नावांपैकी एक आहे. 39,897.91 कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेल्या या लार्ज कॅप कंपनीच्या शेअर्सने दीर्घकाळामध्ये गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. 15 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार आज करोडपती झाला असेल. कंपनीचे जून तिमाहीतील उत्कृष्ट निकाल पाहता, विश्लेषक या शेअर्सचा वरचा कल कायम ठेवण्याची अपेक्षा करत आहेत.
हे लक्षात घ्या कि, शुक्रवारी Astral Limited चे शेअर्स 1.07 टक्क्यांच्या वाढीसह 2,000 रुपयांवर बंद झाले. आज 16 ऑगस्ट रोजी या शेअर्समध्ये 2.78 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 12:45 वाजता त्याची किंमत 1930 रुपये होती. गेल्या एका वर्षात हे शेअर्स 1.99 टक्क्यांनी घसरले आहेत. 2022 मध्ये आतापर्यंत ते 14.24 टक्क्यांनी घसरले आहेत. 17 जानेवारी 2022 रोजी Astral Limited च्या शेअर्सने 2,524.95 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 1,581.55 रुपये आहे. Multibagger Stock
गुंतवणूकदारांना केले मालामाल
एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, गेल्या तीन वर्षांत Astral Limited चे शेअर्स 170 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे, पाच वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 404.82 टक्के रिटर्न दिला आहे. यावेळी हे शेअर्स 396.18 रुपयांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्याचप्रमाणे, गेल्या पंधरा वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 35,806.64% रिटर्न दिला आहे. मार्च 2007 मध्ये शेअर्सची किंमत 5.57 रुपये होती. आज ते 2000 रुपयांपर्यंत वाढले आहे. सध्या, शेअर्स त्याच्या 52-आठवड्याच्या उच्च पातळीच्या खाली 20.79 टक्के आणि त्याच्या 52-आठवड्यांच्या नीचांकीपेक्षा 26.45 टक्के ट्रेड करत आहे. Multibagger Stock
एक लाखाचे बनले 3.59 कोटी
जर एखाद्याने 15 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील आज त्याची गुंतवणूक 3.59 कोटी रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे जर एखाद्याने पाच वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक 505,050 लाख रुपये झाली असेल. Multibagger Stock
या फर्मने दिला खरेदी करण्याचा सल्ला
ब्रोकरेज फर्म शेअरखान म्हणते की,” Astral Limited ने अपेक्षेपेक्षा जास्त कंसोलिडेटेड रेव्हेन्यू मिळवला आहे. या कंपनीचा कंसोलिडेटेड रेव्हेन्यू जूनच्या तिमाहीत वार्षिक 73 टक्क्यांनी वाढून 1,213 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हे लक्षात घ्या कि, कंपनीच्या पाईप्स, एडेसिव्ह आणि पेंट्सच्या उत्पन्नात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. Astral Limited ला बाय रेटिंग देताना, शेअरखानने त्याची टार्गेट प्राईस 2,300 रुपये दिली आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.astralpipes.com/
हे पण वाचा :
Home Loan : SBI चा ग्राहकांना मोठा धक्का !!! होम लोन 0.50 टक्क्यांनी महागले
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण !!!
Rakesh Jhunjhunwala यांना कोणत्या शेअर्समुळे नफा अन् नुकसान झाले ते पहा !!!
5 हजार रुपये ते 46 हजार कोटींचे मालक असा आहे Rakesh Jhunjhunwala यांचा शेअर बाजारातील प्रवास !!!
Axis Bank कडून FD व्याजदरात बदल; पहा आता किती रिटर्न मिळणार