हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock Return : शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता असते. इथे कधी कोणते शेअर्स वर जातील आणि कोणते शेअर्स घसरतील याचा अंदाज बांधणे अवघड असते. मात्र शेअर मार्केटमध्ये असेही काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळवून देतात.
मजबूत नफा कमावणाऱ्या शेअर्समध्ये राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअर्सचाही समावेश आहे. या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना एकाच वर्षातच जवळपास 4,350 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. सोमवारी (30 मे) रोजी देखील या स्टॉकमध्ये वाढ झाली. इंट्राडेमध्ये हा शेअर 1.71 टक्क्यांच्या वाढीसह 8.90 रुपयांवर ट्रेड करत होता. 2.04 कोटी मार्केटकॅप असलेल्या राज रायन इंडस्ट्रीज हा स्मॉल कॅप स्टॉक आहे.Multibagger Stock Return
गेल्या वर्षभरापासून राज रेयॉन इंडस्ट्रीजचे शेअर्स तेजीत आहे. फक्त गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्येच या शेअर्समध्ये 7.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, एका महिन्यात यामध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 4 मे रोजी या शेअर्सची किंमत 4.65 रुपये होती, जी आता वाढून 8.90 रुपये झाली आहे. गेल्या सहा महिन्यांबाबत बोलायचे झाल्यास, या स्टॉकने गुंतवणूकदारांना 559 टक्के इतका मोठा नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4,350 टक्के नफा दिला आहे. Multibagger Stock Return
जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची व्हॅल्यू 44 लाख 50 हजार रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने यामध्ये सहा महिन्यांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याची व्हॅल्यू 6 लाख 59 हजार 258 रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवून हे शेअर्स खरेदी केले असतील तर आता त्याची रक्कम दुप्पट झाली असेल. म्हणजेच त्याला आता 1,99,991 रुपये मिळाले असतील.Multibagger Stock Return
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.rajrayon.com/
हे पण वाचा :
Petrol-Diesel Price : राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलमध्ये आणखी कपात केली जाणार ???
Personal Finance : आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन भाव तपासा
Dog Birthday In Pune University : बड्डे आहे भावाचा ; जल्लोष साऱ्या गावाचा !!!
Investment : रिटायरमेंट नंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी अशा प्रकारे करा प्लॅनिंग !!