रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या शाळेच्या पुनर्बांधणीला स.गा.म. महाविद्यालयाकडून 20 लाखांची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

रयत शिक्षण संस्थेची मुहुर्तमेढ ज्या गावातून रोवली गेली, त्या कराड तालुक्यातील काले या गावी शाळेच्या नविन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीसाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेवून रयत शिक्षण संस्थेच्या तसेच समाजातील घटकांच्या माध्यमातून एक स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांनी पहिले उभारलेले महात्मा गांधी विद्यालय कालेच्या नूतन इमारतीसाठी सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय, कराड यांच्या वतीने 20 लाख रुपयांचा चेक प्रदान करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेचे सचिव डाॅ. व्ही. एस. शिवणकर, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अॅड. रविंद्र पवार व सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कराडचे प्राचार्य डाॅ. मोहन राजमाने यांनी विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष बांधकामास भेट दिली होती. संस्थेस व महाविद्यालयात निधी मिळण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याचा तात्काळ विचार करून बरोबर एक महिन्यांनी भरघोस निधी देण्यात आला आहे.

महात्मा गांधी विद्यालय काले येथील नविन इमारतीचा पायाभरणी समारंभ 12 /12 / 2019 रोजी समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मोहन राजमाने यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी श्री. राजमाने यांनी भरघोस निधी देण्याचा शब्द दिला होता. आज तो शब्द खऱ्या अर्थाने पूर्ण केला.

मदतीचा हात पुढे करा : विकास पाटील

रयत शिक्षण संस्थेची 4 आॅक्टोंबर 1919 रोजी काले (ता. कराड) येथे स्थापना केली. या पहिल्या संस्थेच्या शाळेची आज सुसज्ज अशी इमारत उभी करण्यात येत आहे. तेव्हा रयत शिक्षण संस्था तसेच समाजातील अनेक घटकांनी मदत केली. तसेच माजी विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील अनेकांनी सढळ हताने मदत केली आहे. आतापर्यंत मोठी मदत मिळाली आहे, परंतु इमारतीचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने मदतीचा हात पुढे करावा.”एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ” या उक्तीप्रमाणे आजपर्यंतचे कार्य होत आले आहे. पुढील कार्यासही सहभाग द्यावा, असे आवाहन काले येथील विकास पाटील यांनी केले आहे.

 

 

Leave a Comment