Multibagger Stocks : राकेश झुनझुनवालाची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअर्सने 2 वर्षांत दिला 175% रिटर्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks  : जेव्हा एखादा मोठा गुंतवणूकदार एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा तो कंपनीची वाढ, बॅलन्सशीट तसेच भविष्यातील फंडामेंटल आणि टेक्निकल विश्लेषण देखील करतो. या सखोल अभ्यासामुळे त्यांनी गुंतवणूक केलेल्या बहुतेक कंपन्यांमधील त्यांचे पैसे बुडत नाहीत. त्याचबरोबर याद्वारे त्यांना मोठा रिटर्न मिळवण्यासही मदत होते. भारतीय शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला देखील हीच रणनीती वापरतात. त्यांचे गुंतवणूकीचे दीर्घकालीन धोरण, मंदीच्या बाजारात त्यांनी केलेली खरेदी आणि वैविध्यपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओ यामुळे ते अब्जाधीश बनले आहेत.

The Indian Hotels Company Limited-Maharashtra - Company CSR Profile

टाटा ग्रुपची कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्समध्येही राकेश झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केली आहे. या शेअर्सने गुंतवणूकदारांना गेल्या 2 वर्षात 175 टक्के रिटर्न दिला आहे. BSE वर शुक्रवारी दुपारी 12.14 वाजता हा शेअर 1.59 टक्क्यांच्या वाढीसह 227.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. भविष्यातील मजबूत विकास योजनांमुळे हॉटेल आणि रिसॉर्ट्स सेक्टरच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Multibagger Stocks

Best Multibagger Stock: 2000 रुपये को बनाया 1 लाख, 10 साल में मिला 5000%  रिटर्न - Best multibagger penny stocks more than 5000 percent return in  last 10 years SRF Limited tuts - AajTak

मार्केट कॅप वाढली

याच्या एकच दिवस आधी म्हणजेच गुरुवारी, BSE वर इंडियन हॉटेल्स 3.36 टक्क्यांच्या वाढीसह 223.5 रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी त्याची किंमत 215.2 रुपये होती. याचा अर्थ, गुरुवारी तो प्रति शेअर 8.30 रुपयांनी वाढला. यावेळी कंपनीची मार्केट कॅप 32,207.56 कोटी रुपये झाली आहे. Multibagger Stocks

How Rakesh Jhunjhunwala Made A Tidy Rs 6,000 Cr Profit Via Star Health's  IPO Listing

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर्स आहेत ???

राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये 31 मार्च 2022 पर्यंत इंडियन हॉटेल्सचे 1.57 कोटी इक्विटी शेअर्स किंवा 1.11 टक्के स्टेक आहेत. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे इंडियन हॉटेल्सचे सुमारे 1.43 कोटी इक्विटी शेअर्स किंवा 1.01 टक्के स्टेक आहे. हे जाणून घ्या कि, राकेश झुनझुनवाला आपल्या पत्नीचा पोर्टफोलिओ देखील सांभाळतात. अशाप्रकारे, या कंपनीतील त्यांचा एकत्रित हिस्सा 2.12 टक्के म्हणजेच 3 कोटी इक्विटी शेअर्सपेक्षा जास्त आहे. त्यानुसार, झुनझुनवाला यांना गुरुवारी सुमारे 24.914 कोटी रुपये (3,00,16,965 इक्विटी शेअर्स X रुपये 8.3) चा नफा मिळाला. Multibagger Stocks

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ihcltata.com/

हे पण वाचा :

PAN-Aadhar Linking साठी आता फक्त 6 दिवसच बाकी, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया

PM Kisan च्या e-KYC ची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्यात आली, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया

Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदी तेजीत, नवीन दर तपासा

PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!

Leave a Comment