Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : भारतीय शेअर बाजारासाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरलेले नाही. जागतिक बाजारातही अस्थिरता आहे ज्यामुळे भारतीय शेअर बाजार दबावाखाली आहे. 2022 मध्ये भारतीय शेअर बाजारात लक्षणीय घट झाली आहे, मात्र अस्थिरतेचा कालावधी अजूनही कायम आहे. बाजारातील घसरणीमागे रशिया-युक्रेन युद्ध, वाढती महागाई आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून केलेली प्रचंड विक्री यासारखी अनेक कारणे आहेत. यामुळे शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागला आहे. मात्र, असे असूनही शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांच्यावर या घसरणीचा फारसा परिणाम झालेला नाही. यापैकी काही शेअर्सनी तर 2022 मध्ये 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे.

Sel Manufacturing Company Ltd., (Mehatwara Unit) - Uster Technologies
SEL Manufacturing : SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड ही एक भारतीय वर्टीकल इंटीग्रेटेड मल्टी-प्रोडक्ट टेक्सटाइल कंपनी आहे. कंपनी यार्न, फॅब्रिक्स, रेडिमेड गारमेंट्स आणि टॉवेल्सचे उत्पादन, प्रोसेसिंग आणि ट्रेडिंगमध्ये गुंतलेली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये SEL मॅन्युफॅक्चरिंगच्या एका शेअरची किंमत 49 रुपये होती. जो आता 965 रुपये झाला आहे. अशा प्रकारे, 2022 मध्ये, SEL मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना 2000% रिटर्न दिला आहे. या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत एक लाख रुपये गुंतवणाऱ्यांना 19.69 लाख रुपये मिळवून दिले आहेत. Multibagger Stocks

Kaiser Corporation Share Price Target 2022, 2023, 2024, 2025, 2030

Kaiser Corporation Ltd : कंपनी लेबल, स्टेशनरी, मासिके आणि कार्टन प्रिंटिंगचे काम करते. हे त्याच्या उपकंपन्यांसोबत इंजीनिअरिंग गुड्स, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग इत्यादींमध्ये देखील काम करते. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सने गेल्या वर्षभरापासून मजबूत नफा दिला आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी 2.79 रुपये किंमत असलेला हा शेअर आज 103.25 रुपयांवर आला आहे. 2022 बाबत बोलायचे झाल्यास या वर्षी या शेअर्सने 3436 टक्के रिटर्न दिला आहे. शुक्रवार, 8 जुलै रोजी, या शेअर्स मध्ये 4.98 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. Multibagger Stocks

Gallop coporate jan 2018

Gallop Enterprises : 2022 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 1539 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 31 डिसेंबरला 4.56 रुपये किंमत असलेला हा शेअर आता 78.35 रुपयांवर आला आहे. गेल्या एका वर्षात त्याने 1788 टक्के रिटर्न दिला आहे. शुक्रवारी, 8 जुलै रोजी, Gallop Enterprises चा शेअर 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 78.35 रुपयांवर ट्रेड करत आहे. Multibagger Stocks

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.gallopsenterprise.com/

हे पण वाचा :

Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!

SBI कडून दरमहा 90 हजार रुपये कमावण्याची संधी, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

Gold Price Today : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे नवीन दर पहा

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये 4 वर्ष प्रीमियम भरून मिळवा लाखो रुपये !!!

Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे मिळवा पैसे दुप्पट !!!