हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : सध्या जागतिक शेअर बाजारात प्रचंड अनिश्चिततेचे वातावरण आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही होतो आहे. 2022 मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी सारख्या इंडेक्स मध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. या वर्षात निफ्टी आणि सेन्सेक्स जवळपास 6 टक्क्यांनी खाली आले आहेत. तसेच, स्मॉलकॅप शेअर्समध्ये 10 टक्के तर मिडकॅप शेअर्समध्ये 6.50 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. मात्र सध्याच्या या अनिश्चिततेच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देत आहेत. आज आपण अशाच काही शेअर्स बाबत जाणून घेणार आहोत.
VCU डेटा मॅनेजमेंट – या कंपनीच्या शेअर्समध्ये 10.46 रुपयांवरून 61.90 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. या शेअर्सने एका वर्षात आजपर्यंत जवळपास 500% रिटर्न दिला आहे. त्याची मार्केट कॅप 95 कोटी रुपये आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 65.20 रुपये आहे. मात्र आज (सोमवारी) या शेअर्समध्ये लोअर सर्किट आहे. Multibagger Stocks
एबीसी गॅस – वर्षभराच्या डेटानुसार हे शेअर्स 13 रुपयांनी वाढूवरून 39.75 रुपयांवर पोहोचले आहेत. या कालावधीत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 200 टक्के रिटर्न दिला आहे. त्याची मार्केट कॅप फक्त 7 कोटी रुपये इतकी आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 39.75 रुपये आहे. आज (सोमवारी) यामध्ये अप्पर सर्किट आहे. Multibagger Stocks
ध्रुव कॅपिटल – 2022 मध्ये हे शेअर्स 4.54 रुपयांवरून 24.10 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत शेअर्सने 430 टक्के रिटर्न दिला आहे. त्याची मार्केट कॅप 7 कोटी रुपये आहे. मात्र यामध्ये जोखीम देखील खूप जास्त आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 24.10 रुपये आहे.
सोनल एडेसिव्ह्स – 2022 मध्ये हे शेअर्स 9.80 रुपयांवरून 50.70 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या काळात या शेअर्सने 415 टक्के रिटर्न दिला आहे. त्याची मार्केट कॅप सुमारे 30 कोटी रुपये आहे. सोमवारी यामध्ये अप्पर सर्किटला लागला ज्यामुळे तो 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. Multibagger Stocks
रिस्पॉन्स इन्फॉर्मेटिक्स – या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने 2022 मध्ये 285 टक्के रिटर्न दिला आहे. या शेअर्सची किंमत 12.96 रुपयांवरून 50.05 रुपयांपर्यंत वाढली आहे. हा शेअर्स 52 आठवड्यांच्या टॉपवर ट्रेड करत आहे. आज (सोमवारी) त्यामध्ये अप्पर सर्किट आहे. त्याची मार्केट कॅप 32 कोटी रुपये आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.responseinformaticsltd.com/
हे पण वाचा :
Silver Price : चांदीमध्ये खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ???
रेशनकार्ड असणाऱ्यांना सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा काय आहे पात्रता ?
Bank FD : ‘या’ तीन बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळत आहे जास्त व्याज !!!
Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गाठला सर्वकालीन उच्चांक !!!