हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सध्या जोरदार विक्री होते आहे. या वर्षात आतापर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी 11 मध्ये टक्क्यांहून जास्त घसरण झाली आहे. मात्र, अशा परिस्थितीतही काही स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे. चला तर मग अशाच काही स्टॉक्सबद्दलची माहिती जाणून घेउयात …
मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड – या कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षी आतापर्यंत सुमारे 130 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीची मार्केट कॅप 18,034 कोटी रुपये आहे. तसेच 31 डिसेंबर 2021 रोजी 43 रुपयांवर असलेला हा शेअर आज 17 जून रोजी 96 रुपयांवर ट्रेड करत आहे. Multibagger Stocks
चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड- या शेअर्समध्ये आतापर्यंत 230 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली आहे. NSE वर 17 जून रोजी हा शेअर 324 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याची मार्केट कॅप 5,119 कोटी रुपये इतकी आहे. Multibagger Stocks
भारत डायनॅमिक्स- गेल्या वर्षी 31 डिसेंबरला 391 रुपयांवर हा शेअर सध्या 800 रुपयांच्या आसपास ट्रेड करत आहेत. या कालावधीत या शेअर्समध्ये 106 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कंपनीची मार्केट कॅप 14780 कोटी रुपये इतकी आहे.
BLS इंटरनॅशनल सर्व्हिसेस- 31 डिसेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत 95 रुपयांवर होती जी आता 210 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत यामध्ये 122 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीची मार्केट कॅप 4,329 कोटी रुपये आहे. Multibagger Stocks
वाडीलाल इंडस्ट्रीज- या कंपनीच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 115 टक्के वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी 910 वर असलेल्या शेअर्सची किंमत 1900 रुपयांनी वाढली आहे. त्याची मार्केट कॅप 1403 कोटी रुपये आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ 5 खाजगी बँकाकडून बचत खात्यावर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!
‘या’ Multibagger Stock ने 5 वर्षांत गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
Post Office मध्ये खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!
Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला लाखोंचा नफा !!!
EPFO मध्ये नॉमिनेशन करणे बंधनकारक, त्यासाठीचे संपूर्ण तपशील जाणून घ्या