हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : दीर्घकाळापासून अनेक केमिकल कंपन्यांच्या शेअर्सची गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. या क्षेत्रातील काही शेअर्सनी दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना 800% रिटर्न दिला आहे. ब्रोकरेज हाऊसेस आणि बाजारातील तज्ज्ञ देखील या क्षेत्राबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आहेत. या क्षेत्रातील काही शेअर्स गुंतवणूकदारांना यापुढेही चांगला रिटर्न देऊ शकतात, असे त्यांचे मत आहे.
ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअल ने याबाबत म्हंटले की,”गेल्या 2-3 वर्षात, चांगल्या किंमती, स्थिर कच्च्या तेलाच्या किंमती आणि चीन + 1 पॉलिसीचा फायदा लक्षात घेऊन, भारतीय रासायनिक कंपन्यांचे री-रेट केले गेले आहे. यामध्ये मजबूत कमाई होणे अपेक्षित आहे.” Multibagger Stocks
सुदर्शन केमिकलमध्ये कमाईची संधी
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीच्या स्टॉकने देखील गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देत आपण मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध केले आहे. 17 मे 2006 रोजी या शेअरची किंमत 21 रुपये होती तर 28 सप्टेंबरला तो 420 रुपयांपर्यंत वाढला. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना 1,910% रिटर्न दिला आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियल अजूनही स्टॉकवर तेजीत आहे. याला बाय रेटिंग देत ब्रोकरेजने 585 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Multibagger Stocks
आरती इंडस्ट्रीजने दिला 800% नफा
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, या क्षेत्रातील आरती इंडस्ट्रीजच्या शेअर्सने दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना 800 पट रिटर्न मिळवून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी या शेअर्सची किंमत 22 रुपये होती. आता 28 सप्टेंबर 2022 पर्यंत त्याची किंमत 800 रुपयांवर पोहोचली आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना 79,900% रिटर्न दिला आहे. या स्टॉकसाठी बाय रेटिंग देताना, ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअलने त्यासाठी 960 रुपयांचे टार्गेट दिले आहे. Multibagger Stocks
अतुल इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूकीचा सल्ला
अतुल लिमिटेडच्या शेअर्सनी देखील दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 1 जानेवारी 1999 रोजी या शेअरची किंमत 22 रुपये होती, जी 28 सप्टेंबर 2022 ला 8,940 रुपये झाली. अशा प्रकारे गुंतवणूकदारांना 40,500% रिटर्न मिळाला आहे. जेएम फायनान्शिअलने या स्टॉकसाठी बाय रेटिंग देताना 10,145 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.atul.co.in/
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ बचत योजनेत मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न !!!
Gold Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतीत जोरदार वाढ, आजचे दर पहा
आता WhatsApp द्वारे कळू शकेल ट्रेनचे लाइव्ह स्टेटस, त्यासाठीची प्रक्रिया तपासा
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 6 वर्षात दिला 497% रिटर्न
गेल्या 1 वर्षात ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!