हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर मार्केट हा देखील गुंतवणुकीच्या चांगल्या पर्यांयांपैकी एक आहे. हे लक्षात घ्या शेअर मार्केटद्वारे गुंतवणूकदारांना फक्त शेअर्समध्ये वाढ झाल्याने किंवा काही प्रकरणांत घसरण झाल्याने पैसे मिळत नाही तर त्यासाठी इतरही अनेक मार्ग आहेत. यापैकच एक मार्ग म्हणजे बोनस शेअर्स. याचा अर्थ कंपनीकडून आपल्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात अतिरिक्त शेअर्सचे वाटप केले जाईल. मात्र किती बोनस शेअर्स मिळतील हे कंपनीवर अवलंबून असते. हे जाणून घ्या पुढील महिन्यात एकूण 5 कंपन्यांच्या शेअर्सवर एक्स-बोनस म्हणजेच बोनस शेअर्स मिळणार आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…

Ram Ratna Wires – या कंपनीकडून 28 सप्टेंबर 2022 रोजी एक्स-बोनस देण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यावेळी एका शेअरच्या बदल्यात एक बोनस शेअर मिळणार आहे. हे जाणून घ्या कि, याआधी कंपनीने 5 रुपये लाभांशही जाहीर केला आहे. याने एका वर्षात 39 टक्के रिटर्न दिला असून सध्याची शेअर्सची किंमत 316 रुपये आहे. Multibagger Stocks

Pondy Oxides – ही केमिकल कंपनी आहे आपल्या भागधारकांना 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देतील. यामध्ये 28 सप्टेंबर ही एक्स-बोनस तारीख निश्चित केली आहे. या केमिकल कंपनीने एका वर्षात आपल्या भागधारकांना 80 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. या शेअर्सची सध्याची किंमत 780 रुपये आहे. Multibagger Stocks

GAIL – 6 सप्टेंबर रोजी एक्स-बोनस म्हणून निश्चित केले आहे. या सरकारी कंपनीकडून 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर दिला जाईल. एका वर्षात स्टॉक 6.14 टक्क्यांनी घसरला आहे. त्याची सध्याची किंमत 134 रुपये आहे. Multibagger Stocks

Jyoti Resins – या कंपनीने 8 सप्टेंबर 2022 ही एक्स-बोनस तारीख निश्चित केली आहे. यावेळी कंपनी 1 शेअरच्या बदल्यात 2 बोनस शेअर्स देणार आहेत. कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात 360 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला आहे. सध्या त्याची किंमत 3,566 रुपये आहे. Multibagger Stocks

Ruby Mills – या स्मॉल कॅप कंपनीकडून प्रति शेअर एक बोनस शेअर दिला जात आहे. या कंपनीने 22 सप्टेंबर 2022 रोजी शेअर्सची एक्स-बोनस तारीख निश्चित केली आहे. कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. सध्या याची किंमत 566 रुपये आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rubymills.com/
हे पण वाचा :
Bank Holidays : सप्टेंबरमध्ये बँका 13 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट पहा !!!
Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदीची शेवटची संधी !!!
ICICI Bank च्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर पहा
Loan : एखाद्याच्या कर्जासाठी जामीनदार होण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी !!!
Business Idea : वर्षभर मागणी असलेल्या ‘या’ ड्रायफूटची लागवड करून मिळवा करोडो रुपये !!!




