अमित शहा मुंबई दौरा करणार; गणपती दर्शन की मिशन मुंबई महापलिका?? चर्चाना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत. ५ सप्टेंबरला शाह यांचा मुंबई दौरा असून यावेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अमित शाह आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणार आहेत. परंतु शाह यांच्या दौऱ्याची राजकीय चर्चाच जास्त आहे. आणि याच कारण म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक….

राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपचे संपूर्ण लक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर आहे. भाजपचाच महापौर मुंबई महापालिकेवर बसेल असा दावा भाजप नेत्यांकडून सातत्याने केला आहे. अमित शहांचा मुंबई दौरा राजकीय दृष्या महत्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांच्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हेदेखील १५ आणि १६ डिसेंबरला मुंबईत येणार आहेत.

दरम्यान, आपल्या मुंबई दौऱ्यात अमित शाह लालबागच्या राजाचं आणि सिद्धिविनायकाचेही दर्शन घेणार आहेत. नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाकडे अमित शहा काय मागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.