हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर बाजारातून पैसे कमवण्यासाठी गुंतवणूकदारांना खूप संयम बाळगावा लागतो. शेअर बाजारातून पैसे कमवायला संयम लागतो. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारच शेअर बाजारातून प्रचंड नफा कमावतात. मात्र हे लक्षात घ्या कि, शेअर बाजारात असेही अनेक शेअर्स आहेत ज्यांनी दीर्घकालीन मुदतीमध्ये भरपूर रिटर्न दिला आहे.

आज आपण अशाचा काही शेअर्स बाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार दहा वर्षांत करोडपती बनले आहेत. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घकाळासाठी गुंतवणूकीचे योग्य असे फळ देखील दिले आहे. हे असे शेअर्स आहेत ज्यामध्ये जर एखाद्याने दहा वर्षांपूर्वी पाच लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक 10 कोटींवर गेली असेल.
Multibagger Stocks

Indo Count Industries : दहा वर्षांपूर्वी हा एक पेनी स्टॉक होता. ऑगस्ट 2012 मध्ये प्रति शेअर 1.4 रुपये असणारी त्याची किंमत आता 143 रुपयांवर गेली आहे. गेल्या 10 वर्षांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 9,869 टक्के नफा दिला आहे. जर दहा वर्षांपूर्वी एखाद्याने यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याच्याकडे आज 5.1 कोटी रुपये आले असतील. Multibagger Stocks

Caplin Point Laboratories : या फार्मास्युटिकल कंपनीच्या शेअर्सची किंमत ऑगस्ट 2012 मध्ये 6.10 रुपयांवर होती. गेल्या दहा वर्षांत यामध्ये 13,750 टक्क्यांची वाढ होऊन तो 844.85 रुपयांवर आला आहे. जर दहा वर्षांपूर्वी एखाद्याने यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याच्याकडे आता 6.9 कोटी रुपये आले असतील. Multibagger Stocks

NGL Fine-Chem : ही कंपनी फार्मास्युटिकल्स आणि इंटरमीडिएट्सची निर्मिती करते. ऑगस्ट 2012 मध्ये प्रति शेअर फक्त 10.61 रुपये किंमत असणारा हा शेअर आता 1,794.75 रुपयांवर आहे. गेल्या 10 वर्षात याने तब्ब्ल 16,816% रिटर्न दिला आहे. जर दहा वर्षांपूर्वी एखाद्याने यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याच्याकडे आता 8 कोटी रुपये आले असतील. Multibagger Stocks

Paushak : एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक फॉस्जीन-आधारित स्पेशियलिटी केमिकल बनवणारी Paushak Pharma कृषी रसायन उद्योगांना आपली सेवा पुरवते. हा गुजरात-आधारित अलेम्बिक ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग आहे. ऑगस्ट 2012 मध्ये 50 रुपये किंमत असलेला हा शेअर सध्या 10,050 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअर्सने गेल्या 10 वर्षांत 19,792% रिटर्न दिला आहे. दहा वर्षांपूर्वी यामध्ये कोणी पाच लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 10 कोटी रुपये मिळाले असतील. Multibagger Stocks

Vidhi Specialty Food Ingredients : ऑगस्ट 2012 मध्ये 3.60 रुपये किंमत असलेला हा शेअर आज 400.30 रुपयांवर आहे. अशा प्रकारे याने गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना 11,019% रिटर्न दिला आहे. दहा वर्षांपूर्वी त्यात गुंतवलेले 5 लाख रुपये आज 6.9 कोटी रुपये झाले असतील. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://www.vidhifoodcolor.com/
हे पण वाचा :
Whatsapp वर तुम्हांला कोणी ब्लॉक केलंय?? ‘अशा’ पद्धतीने करा चेक
Multibagger Stock : गेल्या 21 वर्षात ‘या’ शेअर्सद्वारे गुंतवणूकदारांनी मिळवले कोट्यवधी रुपये !!!
Yes Bank ने FD वरील व्याज दरात केली वाढ, नवे दर तपासा
Honda CB300F : Honda ने लॉन्च केली दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजच्या किंमती पहा




