Mumbai Airport Bomb Blast Threat : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Mumbai Airport Bomb Blast Threat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Airport Bomb Blast Threat। महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी समोर आली आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत हा बॉम्बस्फोट होईल अशी धमकी देणारा फोन कॉल मुंबई पोलिसाना आला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले. अखेर सदर धमकी देणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसाना यश आलं आहे. एका ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मनजीत कुमार गौतम नावाच्या आरोपीने मुंबई पोलिसाना अज्ञात नंबर वरून कॉल केला आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली (Mumbai Airport Bomb Blast Threat) . यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य बघून तातडीने तपासाला सुरुवात केली. बॉम्ब शोधक पथके आणि इतर सुरक्षा एजन्सी विमानतळावर हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या. तसेच आरोपीचा मोबाईल ट्रेस करून त्याचा पत्ता शोधण्यात पोलिसाना यश आलं. आरोपी मनजीत कुमार गौतम हा मूळचा उत्तरप्रदेशचा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. मनजीत कुमार गौतमने धमकीचा कॉल का केला? यामागे कोणत्या कटाचा हात नाही ना? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र सध्या तरी त्याने एकट्यानेच हा निनावी कॉल केल्याचं समोर येत आहे.

यापूर्वीही मुंबईला बॉम्बस्फोटाच्या धमक्या- Mumbai Airport Bomb Blast Threat

दरम्यान, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमक्या काय नव्या नाही. सतत अशाप्रकारे निनावी कॉल किंवा मेल मुंबई पोलिसाना येत असतात. यापूर्वी १७ मे रोजी पोलिसांना विमानतळावर आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल मिळाला होता, ज्यामध्ये २००१ च्या संसद हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरुला फाशीची शिक्षा अन्याय्य असल्याचा दावा करण्यात आला होता. याशिवाय या महिन्याच्या सुरुवातीला, महाराष्ट्र सचिवालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षालाही बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल मिळाला होता.