हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Airport) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) दररोज अनेक विमानं उड्डाण घेत असतात. त्यामुळे नियमित स्वरूपात मोठ्या संख्येने प्रवाशांची ये- जा सुरु असते. दरम्यान, अनेकदा बऱ्याच प्रवाशांकडून विमानतळावर बराच काळ प्रतीक्षा करावी लागल्याच्या तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता या तक्रारींची संख्या कमी होणार असे चिन्ह दिसत आहे. कारण, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडून आले आहे. ज्यामुळे प्रवाशांसाठी हवाई प्रवास आनंददायी होणार आहे.
मुंबई विमानतळावर महत्वाचे परिवर्तन (Mumbai Airport)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आता लांबलचक रांगा आणि कंटाळवाणी वाट पाहण्याचे दिवस संपले आहेत. कारण, मुंबई विमानतळाने आपली ई- गेट क्षमता दुप्पट केल्याचे समोर आले आहे. वृत्तानुसार, या परिवर्तनामुळे प्रवेश प्रक्रियेची वेळ १ मिनिटापेक्षा कमी झाली आहे. परिणामी, प्रवाशांना याचा चांगला लाभ होणार आहे. यापूर्वी, प्रवाशांना कर्बसाइड (लँडसाइड) प्रवेश पॉइंटवर कायम प्रतीक्षा करावी लागत होती.
(Mumbai Airport) मात्र, आता टर्मिनल १ आणि २ वर एकूण ६८ ई- गेट्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे, मुंबई विमानतळ मोठ्या संख्येतील प्रवाशांना कार्यक्षमतेने हाताळू शकते. यामुळे CSMIA ची प्रक्रिया क्षमता टर्मिनल २ वर ताशी ७,४४० प्रवासी आणि टर्मिनल १ वर २,१६० इतकी वाढेल.
नुकतेच सुरु केलेले नवे ई- गेट्स डिजीयात्रा (भारताची डिजिटल बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम) वापरकर्ते आणि डिजीयात्रा वापरत नसलेल्या प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे. दरम्यान, गेट्सची संख्ये वाढल्याने आता प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि जलद होणार आहे. (Mumbai Airport) वृत्तानुसार, T2 मधील डिजिटल गेटवे आता २८ समर्पित डिजी यात्रा ई- गेट्ससह २८ समर्पित नॉन- डिजियात्रा ई- गेट्स प्रदान करतो. तसेच टर्मिनल १ (T1) मध्ये ६ समर्पित डिजीयात्रा ई- गेट्स आणि ६ नॉन- डिजियात्रा ई- गेट्स आहेत. याशिवाय प्रवाशांसाठी T2 येथील प्री-अम्बर्केशन सुरक्षा तपासणी क्षेत्रात अतिरिक्त ११८ ई- गेट्स तैनात करण्यात आले आहेत.