Mumbai Bangalore Express Train : मुंबई- बंगळुरू नवीन एक्सप्रेस ट्रेन; पहा वेळापत्रक आणि थांबे

Mumbai Bangalore Express Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Bangalore Express Train । मुंबई आणि बंगळुरू या देशातील २ आघाडीच्या शहरांना जोडणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन नवीन वर्षांपासून सुरु होणार आहे. केंद्रीय रेल्वे विभागाने या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. या नव्या रेल्वेगाडीमुळे दोन्ही शहरातील वाहतूक आणखी सोप्पी आणि आरामदायी होणार आहे. खास करून पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना या ट्रेनचा विशेष फायदा होईल. आज आपण या ट्रेनचे वेळापत्रक आणि ती कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबेल याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तर मित्रानो, मुंबई ते बंगळुरू रेल्वे आठवड्यात दोन दिवस धावणार असून, आधुनिक एलएचबी प्रकारच्या १७ डब्ब्यांची ही एक्स्प्रेस नववर्षातच सुरू होण्याची होणार आहे. बंगळुरू मधील आयटी आणि उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच पुणे-मुंबईमध्ये शिक्षण व नोकरी करणाऱ्या प्रवाशांसाठी रात्री सुटणारी ही गाडी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जे तरुण मुंबई- पुण्यात कामाला किंवा शिक्षणासाठी आहेत त्यांनाही या ट्रेनचा मोठा फायदा होईल. Mumbai Bangalore Express Train

कसे आहे वेळापत्रक – Mumbai Bangalore Express Train

मुंबई ते बंगळुरू ही ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून रविवारी आणि बुधवारी रात्री आठ वाजून 35 मिनिटांनी सुटेल. तर शनिवारी आणि मंगळवारी रात्री साडे दहा वाजता बेंगलोर स्थानकावरून सोडली जाणार आहे. या नव्या एक्सप्रेस ट्रेनला दावणगेरे, हुबळी, धारवाड, बेळगावी, मिरज, सांगली, कराड, सातारा, लोणंद, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण व ठाणे या महत्त्वाच्या स्टेशनवर रेल्वे मंत्रालयाकडून थांबे मंजूर करण्यात आले आहेत. हुबळी, मिरज आणि पुणे येथे या गाडीत पाणी भरण्यात येणार असून, मुंबई आणि बंगळुरू येथे यांना दुरुस्ती व देखभाल केली जाईल.