Mumbai Bomb Blast Threat : 2 दिवसांत बॉम्बस्फोट होणार; धमकीच्या मेलने मुंबईत खळबळ

Mumbai Bomb Blast Threat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Bomb Blast Threat । पाकिस्तान विरुद्धची युद्धजन्य परिस्थिती आता कुठे थांबली असतानाच मुंबईतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येत्या २ दिवसांत मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. इ मेलच्या माध्यमातून हि धमकी मिळालीय. राज्याच्या डिजास्टर मॅनेजमेंट रूमला हा मेल आला असून सोमवार ते बुधवारदरम्यान सतर्क रहा असं या मेलमध्ये म्हंटलं आहे. महाराष्ट्र नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. धमकीच्या या मेल नंतर मुंबई पोलीस सतर्क झाली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.

वेळ किंवा ठिकाणाचे नाव सांगितलेलं नाही- Mumbai Bomb Blast Threat

याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत बॉम्बस्फोट होण्याची चेतावणी देणारा एक निनावी ईमेल महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला आहे . या मेलमध्ये कोणतीही विशिष्ट वेळ किंवा ठिकाणाचे नाव सांगितलेलं नाही, पण लवकरच स्फोट होईल. कृपया दुर्लक्ष करू नका, असा मजकूर ई-मेलमध्ये नमुद करण्यात आला आहे. या धमकीनंतर (Mumbai Bomb Blast Threat) मुंबईत एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा ऍक्शन मोड मध्ये आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा तपास पोलीस करत आहेत. तसेच हा धमकीचा मेल कोणी पाठवला आहे याचा शोध घेण्याचं कामही पोलिसांकडून सुरु आहे. सध्या पोलीस सदर ईमेल आयडी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, मुंबई हि कायमच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिली आहे. १९९३ चा साखळी बॉम्बस्फोट असो वा २६/११ चा हल्ला असो…. मुंबईलाच दहशदवाद्यांकडून लक्ष्य केलं जाते हा इतिहास आहे. त्यामुळेच पाकिस्तान विरुद्व तणाव वाढला असतानाच मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी आस्थापना, संवेदशील ठिकाणे व धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती व रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथक तपासणी करीत आहे.