Mumbai Coastal Road : मुंबईकरांनो, फक्त ‘या’ वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवास करता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील कोस्टल रोडचा (Mumbai Coastal Road) दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोेन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केल्यावर या मार्गाचे लोकरण करण्यात आलं आहे. कोस्टल रोडच्या या दुसऱ्या टप्प्यामुळं वरळी, वांद्रे, ताडदेव, पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला वेग मिळणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा 6.25 Km अंतरराचा प्रवास अवघ्या 10 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. मात्र मुंबईकरांनो, दररोज तुम्हाला या मार्गावरून प्रवास करता येणार नाही. त्यासाठी प्रवास करण्यापूर्वी याबाबतची माहिती घेऊनच घराबाहेर पडा.

कोणत्या वेळेत प्रवास करता येणार – Mumbai Coastal Road

सोमवार ते शुक्रवारपर्यंत म्हणजेच आठवड्यातून फक्त पाच दिवस हा कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील बोगदा वाहतुकीसाठी खुला असेल. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजेच एकूण 16 तास तुम्ही या मार्गावरून प्रवास करू शकता. या प्रकल्पातील उर्वरित काम आणि देखभालीचं काम अजूनही सुरूच असून त्यासाठी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी हा मार्ग प्रवासासाठी बंद असेल प्रवाशांनी घ्यावी. पूर्ण झालेला भाग वाहतुकीसाठी खुला केल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास जलद आणि आरामदायी होईल असं बोललं जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साथीने याच बोगद्यातून विंटेज कारमधून प्रवास करीत पाहणी केली आहे. या भूमिगत मार्गात (Mumbai Coastal Road) अत्यावशक सर्व यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत. लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पहिला टप्पा सुरू केला. दुसरा टप्पा सुरू करत आहोत तिसरा टप्पा 10 जुलै रोजी होईल. आधी 40 ते 50 मिनिटं लागत होती आता 9 मिनिटात हा टप्पा पार करता येणार आहे. मुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटल.