हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mumbai Coastal Road – मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.. मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या कोस्टल रोडचे काम पूर्ण झाले असून सोमवारपासून हा रोड प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. उद्या म्हणजेच म्हणजेच 26 जानेवारीच्या मुहूर्तावर या कोस्टल रोडचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोस्टल रोडमुळे मरिन ड्राइव्ह ते वरळी-वांद्रे हा प्रवास अवघ्या 9 मिनिटात पूर्ण करता येणार असून मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे…
मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 9 मिनिटात (Mumbai Coastal Road)-
उदघाटनानंतर कोस्टल रोड सोमवारपासून सर्व मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला केला जाणार आहे. यामुळे मरिन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 9 मिनिटात होणार आहे. या मार्गावरून सकाळी 7 ते मध्यरात्री 12 च्या दरम्यान प्रवास करता येणार आहे. रविवारी कोस्टल मार्गिकच्या अंतिम टप्यासोबत वरळी, प्रभादेवी, लोअर परळ, लोटस जंक्शन आदी भागातील तीन आंतरमार्गिका ही सुरू करण्यात येणार आहेत.
बो आर्च स्ट्रिंग गर्डर –
कोस्टल रोडची (Mumbai Coastal Road) पहिली मार्गिका मागील वर्षी 12 मार्च रोजी खुली झाली. त्यानंतर थेट वांद्रेपर्यंतचा टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबईच्या दक्षिण टोक नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत जलद वेगाने पोहोचण्यासाठी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे. दक्षिण मुंबईकडून उत्तर मुंबईकडे जाणारी वाहतूक वरळी- वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले आहेत. हे पूल बांधण्यासाठी प्रथमच बो आर्च स्ट्रिंग गर्डर स्थापन करण्यात आले आहेत. या पुलांमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मागचि वरळीकडील दोन्ही टोक आता थेट जोडले गेले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांचा प्रवास जलद होण्यास मदत होणार आहे.
हे पण वाचा : राज्यात थंडीचा जोर वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज पहाच
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती; असा करा अर्ज