हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Dabbawala Service Hike। डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात तुळशी माळ, पांढरा लेंगा आणि सफेद सदरा असा हा मुंबईचा डब्बेवाला… अचूक वेळेत आणि अचूक जागी डब्बे पोहचवण्यात मुंबईच्या डब्बेवाल्यांचा हात कोणीच पकडू शकत नाही. मुंबईचा डब्बेवाला म्हणजे मुंबईच्या सामाजिक आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग.. मात्र सध्याच्या महागाईचा फटका या डब्बेवाल्यानाही बसतोय. त्यामुळेच आता मुंबईच्या डबेवाल्यांकडून दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. महिन्याला २०० रुपये शुल्क त्यानुसार वाढवण्यात आले आहेत.
मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी याबाबत सांगितलं कि, मुंबईतील डबेवाल्यांनी प्रत्येक डब्यामागे मासिक शुल्कात २०० रुपयांची वाढ केली आहे. प्रवासातील जोखीम आणि वाढती महागाई या २ प्रमुख कारणांमुळे हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. डबेवाले हे नेहमीच त्यांच्या वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे इतके वर्ष ते ग्राहकांचा विश्वास जपत आहेत. त्यांनी आतापर्यंत अखंड सेवा दिली आहे. मात्र, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सेवा शुल्क वाढवणे (Mumbai Dabbawala Service Hike) आवश्यक बनले होते. म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी म्हंटल.
किती दर वाढ? Mumbai Dabbawala Service Hike
जर डबा घ्यायच्या ठिकाणापासून डबा देण्याचे ठिकाण अर्थात कार्यालय पाच किमी अंतरावर असेल तर त्या सेवेसाठी जुन्या दरानुसार मासिक 1200 रुपये घेतले जात होते. परंतु आता नव्या दरवाढी नंतर आता 1200 ऐवजी 1400 रुपये द्यावे लागतील. तर पाच किलोमीटरच्या पुढे सेवा द्यायची असल्यास, डबेवाल्यांच्या आवश्यकतेनुसार पूर्वीप्रमाणेच प्रत्येकी 300 ते 400 रुपये अतिरिक्त शुल्क (Mumbai Dabbawala Service Hike) आकारले जाणार आहे.
७ जुलैला डबेसेवा बंद-
दरम्यान, आषाढी एकादशी निमित्त ७ जुलैला डबेसेवा बंद असणार आहे. कारण मुंबईचा डब्बेवाला जरी कामगार म्हणून मुंबईत काम करत असला तरी तरी त्याची श्रद्धा हि विठ्ठलावर असते, डब्बेवाल्यांची पंढरीची वारी कधीही चुकत नाही.. यंदाही डब्बेवाल्यांनी वारीला जाण्यासाठी एक दिवसांची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे ७ जुलैला मुंबईत डबेसेवा बंद असणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनने अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. मुंबईचा डबेवाला कामगार ५ जुलै रोजी रात्री पंढरपूरला रवाना होईल. ६ जुलै रविवार व एकादशीची शासकीय सुट्टी आहे, त्यादिवशी डबेवाले पांडुरंगाचे दर्शन घेतील. सोमवार, ७ जुलै सोमवार द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडतील व ते मुंबईला रवाना होतील. ८ जुलै मंगळवार डबेवाले नेहमीप्रमाणे कामावर हजर होतील, असे सुभाष तळेकर यांनी म्हटले.




