Mumbai Dhule Express Train : मुंबई- धुळे ट्रेनचे वेळापत्रक बदललं; प्रवासाआधी जाणून घ्या

Mumbai Dhule Express Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Dhule Express Train । मुंबई ते धुळे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई- धुळे ट्रेनच्या वेळापत्रकात थोडा बदल झाला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी सुटणारी एक्स्प्रेस ट्रेन आता धुळे स्थानकावर अर्धा तास लवकर पोचणार आहे. येत्या १५ जुलैपासून हि ट्रेन अर्धा आधीच धुळे रेल्वे स्टेशनवर दाखल होईल. मध्य रेल्वे प्रशासनाने विशेषतः चाळीसगाव ते धुळेदरम्यानच्या सर्व स्थानकांसाठी सुधारित वेळापत्रक प्रकाशित केले आहे. त्यामुळेही तुम्हीही मुंबई धुळे एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करणार असाल तर आधी सुधारित वेळापत्रक पहा आणि मगच प्रवास करा.

सध्या नियमितपणे धावणारी मुंबई ते धुळे ही रेल्वे गाडी (11011) दररोज दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटते आणि त्याच दिवशी रात्री 8.55 वाजता धुळे स्थानकात पोहोचते. तसेच, धुळे येथून मुंबईकडे धावणारी (11012) गाडी दररोज सकाळी 6.30 वाजता धुळे स्थानकावरून सुटते आणि दुपारी 2.15 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचते. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा आणि शिरूड या स्थानकांवर हि एक्सप्रेस ट्रेन थांबते. मात्र आता १५ जुलैपासून या वेळेत थोडाफार बदल होईल. त्यामुळे काही स्थानकांवर हि ट्रेन (Mumbai Dhule Express Train) यापूर्वी पेक्षा आधी पोचेल.

कस असेल नवीन वेळापत्रक– Mumbai Dhule Express Train

मुंबई धुळे एक्सप्रेस ट्रेन (Mumbai Dhule Express Train) आधीप्रमाणेच दुपारी 12 वाजता मुंबईतून निघेल. मात्र नव्या वेळापत्रकानुसार चाळीसगाव रेल्वे स्थानकावर ती आता 15 मिनिटे लवकर म्हणजेच रात्री 7.10 ऐवजी 6.55 वाजता दाखल होणार आहे. तसेच जामदा स्थानकावर रात्री 7.30 ऐवजी 7.15 वाजता, तर शिरूड स्थानकावर 8.06 ऐवजी 7.44 वाजता पोहोचेल. या ट्रेनचा शेवटचा स्टॉप असलेल्या धुळे रेल्वे स्थानकावरही आता ही ट्रेन रात्री 8.55 ऐवजी 8.25 वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे धुळेकरांना मुंबईवरून धुळ्याला अर्धा तास लवकर पोचता येणार आहे. तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.