Mumbai E-Water Taxi : देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार; पहा कसा असेल रूट

Mumbai E-Water Taxi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai E-Water Taxi । मुंबईकरांसाठी आणि मुंबईत पर्यटनाला जाणाऱ्या इतर पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १ ऑगस्ट पासून मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गांवर हि इलेक्टिक वॉटर टॅक्सी धावणार आहे. आगामी काळात हि इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. या वॉटर टॅक्सिमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. तसेच मुंबईकरांना पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे.

खरं तर यापूर्वीच मुंबईत विविध मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा (Mumbai E-Water Taxi) सुरू करण्यात आल्या. मात्र, त्या सर्व पेट्रोल- डिझेलवर चालणाऱ्या असल्याने त्याचे तिकीटदर सामान्य प्रवाशांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे काही काळातच त्या सेवा बंद पडल्या. मात्र ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्चात बचत होणार असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच या उपक्रमामुळे एका बाजूला समुद्र वाहतुकीला प्रोत्साहन मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला, वाढत्या प्रदूषणाची समस्याही रोखली जाणार आहे.

मुंबईमध्ये धावणारी ही ई-वॉटर टॅक्सी (Mumbai E-Water Taxi) विदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली आहे. ‘एमडीएल’ने एकूण सहा वॉटर टॅक्सी तयार केल्या असून त्यातील पहिली 24 आसनी वातानुकूलित टॅक्सी सध्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस कंपनीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या नव्या वॉटर टॅक्सिमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे, पैशाची बचत होणार आहे तसेच वाहतूक कोंडीतूनही सुटका होणार आहे. त्यामुळे तिहेरी फायदा मुंबईकरांना मिळणार आहे .

कशी आहे ई-वॉटर टॅक्सी ? Mumbai E-Water Taxi

लांबी : १३.२७ मीटर
रुंदी : ३.०५ मीटर
प्रवासी क्षमता : २४ प्रवासी
वेग : १४ नॉटिकल माइल्स
बॅटरी क्षमता : ६४ किलोवॅट (चार तासापर्यंत)

या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीसाठी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस, जेएनपीए जेट्टीवर चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरू आहे. जेएनपीएमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम आठवड्यात पूर्ण होईल.