Mumbai : मुंबईत आग लागण्याच्या घटना वांरवार घडत असतात. कधी गोडाऊन तर कधी मोठाल्या इमारतींना आग लागल्याच्या घटना मुंबईकरांनी (Mumbai) अनुभवल्या आहेत. मात्र आता आगीच्या घटना रोखण्यासाठी हायराईज इमारतींना मुंबईच्या अग्निशामक दलाने फायर ऑडिट अहवाल सादर करण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.
फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार उंच इमारतींना जानेवारी आणि जुलै महिन्यात असे वर्षातून दोनदा फायर ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे एवढेच नव्हे तर अग्निशामक दलाचे (Mumbai) पथक अशा इमारतींना अचानक भेटी देतील तेव्हा फायर ऑडिट न झाल्यास दहा दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशामक दलाला 15000 कॉल्स आले होते त्यापैकी पाच हजार 74 कॉल आधी संदर्भात असल्याची माहिती मिळाली आहे.
इलेट्रीक ऑडिट देखील अनिवार्य
एक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाकडे (Mumbai) सध्या ९० मीटर उंचीच्या शिड्या आहेत. याच्या मदतीने 100 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींमध्ये आग विझवता येते. मात्र उंच इमरतींमध्ये आग विझवणे हे एक आव्हानच आहे म्हणूनच अशा इमारतींमध्ये स्प्रिंकलर लावणे अनिवार्य केले आहे. उंच इमारतींमध्ये केवळ फायर ऑडिटच नाही तर इलेट्रीक ऑडिट देखील अनिवार्य केले आहे. कारण अशा उंच इमारतींमध्ये शॉर्ट सर्किट च्या घटना सुद्धा घडतात. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
इमारतींची आकस्मिक तपासणी(Mumbai)
मुंबईचा (Mumbai) विचार करता एकूण 40 लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. यामध्ये 3629 उंच इमारती आणि 362 उंच इमारतींचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, इशारे देऊनही सोसायटी आणि उंच इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केले जात आहे.त्यामुळे प्रत्येक प्रभागात मोठ्या इमारतींची यादी तयार करण्यात येत आहे. जानेवारी आणि जुलैमध्ये फायर ऑडिट न केलेल्यांची यादी पाहिल्यानंतर अशा इमारतींची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात एक टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.