Mumbai Floating Hotel : मुंबई मध्ये सध्या अनेक विकास प्रकल्प सुरु आहेत. नुकतेच मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले आहे. आता मुंबईच्या सौन्दर्यात आणखी भर पडणार आहे, कारण मुंबई च्या समुद्रात लवकरच तरंगते हॉटेल (Mumbai Floating Hotel) उभे राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
हे फ्लोटेल मरीन ड्राइव्हजवळ उभारले जाणार आहे. मुंबईतील पर्यटन स्थळांना चालणा देण्यासाठी ‘फ्लोटेल’ (Mumbai Floating Hotel)उभारण्यात येणार आहे. यापूर्वी वांद्रे येथील समुद्रात आशाच पद्धतीचा वापर करून ‘फ्लोटेल्स’ उभारले आहे. मात्र, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू असल्याने ‘फ्लोटेल’कडे जाणारी जेटी बंद करण्यात आली आहे. परिणामी ‘फ्लोटेल’ सध्या बंद आहे. एमएमबीने त्याच जमिनीवर ‘फ्लोटेल’ उभारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. समुद्रातील फ्लोटेल वर पर्यटकांना जाता यावं यासाठी NCPA म्हणजेच नरिमन पॉइंटजवळ 10,000 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली नौदल जेट्टी उभारली जाणार आहे. जेट्टी आधुनिक सोयी सुविधांची असणार आहे
हेलिकॉप्टरने थेट उतरता येणार ‘फ्लोटेल’वर (Mumbai Floating Hotel)
विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांना हेलिकॉप्टरने उतरण्यासाठी थेट ‘फ्लोटेल’वर (Mumbai Floating Hotel) जावे लागते त्यासाठी हेलिपॅडची सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच टर्मिनल, कॅन्टीन, स्पीड बोटीच्या वाहतुकीसाठी जलवाहिनी, जेट्टीच्या लॉटपासून संरक्षणासाठी ब्रेकवॉटर आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या ‘फ्लोटेल’साठी सुमारे 240 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. फ्लोटेल वर्षातील 275 दिवस सुरू राहणार आहे. पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात समुद्र असल्याने ‘फ्लोटेल’ काही काळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्याधुनिक सर्व सोयीसुविधांयुक्त असेल फ्लोटेल (Mumbai Floating Hotel)
फ्लोटेलवर विविध खाद्य रेस्टॉरंट्स, बार, कॅसिनो, बँक्वेट हॉल, शॉपिंग मॉल्स, स्विमिंग पूल, लायब्ररी सुविधा, नाटकांसाठी थिएटर आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी थिएटर असणार आहे. यातून मिळणाऱ्या महसुलाचा काही भाग ‘एमएमबी’ला (Mumbai Floating Hotel) दिला जाणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘फ्लोटेल’ प्रत्यक्षात येण्यासाठी सुमारे 4 वर्षे लागतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.