हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Ganeshotsav Special Trains । येत्या २७ ऑगस्टला गणेशोत्सव असून गणरायाच्या आगमनाची सर्वच आतुरतेने वाट बघत आहेत. खास करून कोकणी माणसासाठी गणपती उत्सव म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण…. मुंबई- पुणेसारख्या ठिकाणी कामाला आलेला चाकरमानी कोकणी माणूस एकवेळ दिवाळीला गावी जाणार नाही, पण गणपतीला हटून सुट्टी घेणार म्हणजेच घेणारच आणि कोकणात जाऊन उत्साहाने गणेशाचे स्वागत करणार…. त्यामुळे साहजिकच, कोकणात जाणाऱ्या एसटी बस आणि ट्रेनला मोठी गर्दी बघायला मिळते. यावर उपाय म्हणून आणि प्रवाशांचा प्रवास कोणत्याही ताणाशिवाय व्हावा यासाठी पश्चिम रेल्वेने ३ विशेष ट्रेनची घोषणा केली आहे.
१) मुंबई सेंट्रल – ठोकूर ट्रेन –
ही ट्रेन २६ ऑगस्टपासून धावेल. ट्रेन क्रमांक ०९०११ मुंबई सेंट्रल – ठोकूर स्पेशल (Mumbai Ganeshotsav Special Trains) मुंबई सेंट्रलहून दर मंगळवारी सकाळी ११:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:५० वाजता ठोकूरला पोहोचेल. ही ट्रेन २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर २०२५ रोजी धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१२ ठोकूर – मुंबई सेंट्रल स्पेशल बुधवारी सकाळी ११:०० वाजता ठोकूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:१५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही गाडी २७ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर २०२५ रोजी धावेल.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –
ही ट्रेन बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरडेश्वर, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंडापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरथकल स्टेशनवर या रेल्वे स्टेशनवर थांबेल. या ट्रेन मध्ये एसी २-टायर, एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील .
२) मुंबई सेंट्रल – सावंतवाडी ट्रेन – Mumbai Ganeshotsav Special Trains
ट्रेन क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड स्पेशल ट्रेनआठवड्यातून ४ दिवस रविवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार धावेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. ती मुंबई सेंट्रलहून सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २:३० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल. . त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०२० सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल आठवड्यातून ४ दिवस म्हणजे रविवार, सोमवार, गुरुवार, शनिवार धावेल. ही ट्रेन सावंतवाडीहून सकाळी ०४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८:१० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही रेल्वेगाडी २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. Mumbai Ganeshotsav Special Trains
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –
हि रेल्वेगाडी बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये एसी २-टियर, एसी ३-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास डबे असतील.
३) वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी
ही गाडी २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल. (Mumbai Ganeshotsav Special Trains) ट्रेन क्रमांक ०९०१५ वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी स्पेशल वांद्रे टर्मिनस येथून दर गुरुवारी दुपारी २:२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ००:३० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१६ रत्नागिरी – वांद्रे टर्मिनस स्पेशल ट्रेन दर शुक्रवारी पहाटे ०१:३० वाजता रत्नागिरीहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५ पर्यंत धावेल.
कोनोकणत्या स्थानकांवर थांबा –
वांद्रे टर्मिनस – रत्नागिरी ट्रेन बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्टेशनवर थांबेल. या ट्रेनमध्ये द्वितीय श्रेणीचे आसन आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.




