धक्कादायक! मुंबईत महिलेवर सामूहिक बलात्कार; ४ आरोपींना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । देशातील विस्तारात चाललेली महानगर महिलांसाठी किती सुरक्षित आहेत यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाची धग आजही कायम असताना मुंबईत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील आपल्या घराकडे निघालेल्या एका प्रवासी महिलेवर मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे.

घटना काल रात्री ११ च्या सुमारास घडली. या प्रकरणातील ४ आरोपींना नेहरु नगर पोलिसांनी अटक केली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. रात्री घडलेल्या या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले अशी आरोपींची नावे आहेत.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

प्रेमवीर पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न