Thursday, October 6, 2022

Buy now

मुंबई-गोवा महामार्गावर दोन डंपरची एकमेकांना धडक, चालकाचा जागीच मृत्यू

सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – मुंबई गोवा महामार्गावर एका डंपरला मागून धडक दिल्यानं दुसऱ्या डंपरमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर उभ्या डंपरला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. त्यामुळे या अपघात (Accident) झाला. मुंबई गोवा महामार्गावरच्या झाराप-पत्रादेवी बायपास रोडवर हा भीषण अपघात (Accident) झाला. मळगाव इथं उभ्या असलेल्या डंपरला मागून येणाऱ्या दुसऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातात (Accident) भरधाव डंपरमधील चालकाचा जोरात मार बसून जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की डंपर चक्क डिव्हायडरवर चढला आणि मागील डंपरचा चक्काचूर झाला. तर मागून धडक दिलेल्या डंपर चालकाचा मृतदेह डंबरच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. भरधाव डंपर चालकाला रस्त्याच्या बाजूला उभा केलेला डंपर न दिल्यानं हा अपघात घडला.

तसेच डोळ्यावर झोप आलेली असल्याकारणानं डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात (Accident) घडला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. परशुराम राठोड या 24 वर्षीय चालकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. मृत परशुराम राठोड हा कर्नाटकातील विजापूरचा असून तो कुडाळच्या गुढीपूर इथं राहायला होता. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जेसीबीच्या साहाय्यानं मृत चालकाला डंपरच्या बाहेर काढले.

हे पण वाचा :

नाशिकमध्ये रेल्वेखाली उडी घेऊन माय-लेकीची आत्महत्या

बड्डे आहे भावाचा !!! जल्लोष साऱ्या गावाचा !!!

राज्यसभा निवडणुकीत कोणी घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास…; संजय राऊतांचा थेट फडणवीसांना इशारा

राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी कपात केली जाणार ???

आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!