हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये आज गतविजेता मुंबई इंडिअन्स आणि राजस्थान रॉयल मध्ये सामना होणार असून दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणे अतिशय महत्त्वाचे आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे तर राजस्थान 6 व्या स्थानावर आहे. त्यामुळे तब्बल 5 वेळा आयपीएल चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या चाहत्यांना पुन्हा एकदा अपेक्षा आहे.
मुंबईला प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. तसेच नेट रनरेट वर मुंबईच भविष्य अवलंबून असेल. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थान वर मोठ्या फरकानं विजय मिळवण गरजेचे आहे. त्यासाठी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डीकॉक आणि कायरॉन पोलार्ड यांना आपली सर्वोत्तम कामगिरी करणे महत्त्वाचे आहे. हार्दिक पंड्याने गेल्या लढतीत चांगली फलंदाजी केली. राजस्थानचा मुख्य गोलंदाज मुस्तफिजूर रहमान हा अनुभवी आहे. त्याच्यापासून मुंबईच्या गोलंदाजांनी सावध राहत खेळणे आवश्यक आहे.
दुसरीकडे राजस्थानच्या नावावरही मुंबई इतकेच गुण असून यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या मुंबईकर फलंदाजांकडून त्यांना पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. कर्णधार संजू सॅमसननेही छाप पाडली आहे. राजस्थान गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानी आहे. आपल्या १२ सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला असून १० गुणांसहीत ते निव्वळ धावगतीच्या जोरावर समान म्हणजेच प्रत्येक १० गुण असूनही मुंबईहून एक स्थान वर आहेत. त्यामुळे दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असलेला हा सामना रंगतदार होणार हे नक्की