IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा बाजार उठला कसा? हार्दिकच्या 3 मोठ्या चुका पहाच

Mumbai Indians Mistake
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) … IPL च्या इतिहासातील सर्वात मजबूत संघ … तब्बल ५ वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेला.. श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीचा अन सर्वात मोठा फॅन बेस असलेला संघ… जेव्हा जेव्हा आयपीएल स्पर्धा सुरु होते तेव्हा तेव्हा प्ले ऑफ मध्ये मुंबई हमखास पोचणार असा विश्वास चाहत्यांसह क्रिकेट जाणकारांनाही असतो… सचिन तेंडुलकरपासून ते रिकी पॉन्टिंग, रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंनी आत्तापर्यंत मुंबईला आणि मुंबईच्या चाहत्यांना नेहमीच सोन्याचे दिवस दाखवले.. मात्र यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबईचा संघ अगदी तळाला गेला आहे. आयपीएल वर एकेकाळी अधिराज्य गाजवणाऱ्या मुंबई इंडियन्सचे नेमकं चुकलं कुठे?? रोहितच्या बदली हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार करून भविष्याचा विचार करणाऱ्या टीम मॅनेजमेन्टने नेमकी कुठे माती खाल्ली तेच आपण जाणून घेऊयात….

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा बाजार उठला कसा? याहे पहिले कारण म्हणजे हार्दिक पांड्याला कर्णधार करणं –

मागे वळून जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल कि रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याला कर्णधार करणे मुंबईची सर्वात मोठी घोडचूक ठरली … खरं तर इतिहासात जाऊन बघायचं झाल्यास रोहित शर्माने २०१३ साली मुंबईची धुरा हातात घेतल्यापासून संघाचे नशीब फळफळलें होते. रोहित शर्माने आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशा ५ वेळा मुंबई इंडियन्सला चॅम्पियन केलं. रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. एवढच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाचेही नेतृत्व सुद्धा रोहित शर्माकडे आहे. अशावेळी अचानकपणे रोहितचे कर्णधारपद काढणं मुंबईच्या अंगलटी आल्याचे दिसते. चाहत्यांना सुद्धा हा निर्णय कधी पटला नव्हता… याचाच परिणाम म्हणजे सुरुवातीच्या काही सामन्यात मैदानावरील उपस्थित प्रेक्षकांकडून हार्दिक पांड्याला डिवचण्यात आणि चिडवण्यात आलं होते. चाहत्यांचा रोष पाहून हार्दिकची मैदानावरील कामगिरी सुद्धा गंडली… आणि मुंबईचं ड्रेसिंग रूम मधील वातावरण सुद्धा बदललं. यापूर्वी रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई एकसंघ वाटतं होती. मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखाली हीच गोष्ट प्रकर्षाने जाणवली… हार्दिक फलंदाजी, गोलंदाजी आणि नेतृत्व या तिन्ही स्तरावर पुरता फेल गेला… याचा फटका संपूर्ण संघाला सहन करावा लागला…

दुसरी गोष्ट म्हणजे बुमराहचा वापर नीट न करणे –

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा फक्त मुंबई इंडियन्सचाच नव्हे तर भारतीय क्रिकेटचा मुख्य गोलंदाज…. आपल्या अचूक यॉर्करने बुमराहने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्यात … आणि वेळप्रसंगी टिच्चून गोलंदाजी करत अनेक धावाही रोखल्या आहेत. यंदाच्या आयपीएल यामध्येही बुमराहने सार्वधिक बळी घेऊन तो पर्पल कॅपचा मानकरी ठरला आहे. परंतु ज्याप्रकारे रोहित शर्मा बुमराहचा योग्य वापर करत होता तसा वापर हार्दिकला करता आला नाही. मुंबईच्या अनेक सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने २०० पेक्षा जास्त धावा चोपल्या.. अशावेळी बुमराहला कधी गोलंदाजीला आणावं हेच हार्दिकला समजलं नाही…. जेव्हा समोरचा फलंदाज मुंबईच्या इतर गोलंदाजांवर आक्रमक करत असतात त्यावेळी बुमराहला बॉलिंगला आणून फलंदाजांना बॅकफूटवर ढकलण्याची गरज होती मात्र हार्दिक इथेही फेल गेला. त्याचाच परिणाम म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईच्या गोलंदाजांना तुफान मार पडल्याचे दिसलं.

आता तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे टीम डेव्हिडला उशिरा बॅटिंगला पाठवणं….

खरं तर टीम डेव्हिड हा मुंबईच्या संघातील एकमेव असा हार्ड हिटर जो फक्त १ ओव्हर मध्येही डाव पलटवण्याची क्षमता राखतो… यापूर्वी केरॉन पोलार्डने अनेकदा मुंबईला अशक्यप्राय विजय मिळवून दिले होते. आता त्याची रिप्लेसमेंट म्हणून हि जबाबदरी टीम डेव्हिडची होती… यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा डेव्हिडकडे ती संधी होती मात्र तो निष्प्रभ ठरला… यामागील मुख्य कारण म्हणजे डेव्हिडला खूप उशिरा बॅटिंगला पाठवणं … टिळक वर्मा, हार्दिक पंड्या आणि नेहाला वढेरा यांच्यानंतर डेव्हिडला फलंदाजीला पाठवणं म्हणजे स्वतःच्या हाताने पायावर दगड मारण्यासारखं आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैद्राबाद आणि दिल्ली कपिटल्स यांनी जेव्हा २०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या त्यावेळी या तिन्ही सामन्यात मुंबईला निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला आणि कारण होते डेव्हिडला मॅच हातातून गेल्यानंतर फलंदाजीला धाडणे … हार्दिकने कोणता विचार करून डेव्हिडला खूपच खालच्या क्रमांकावर संधी दिली हे त्याच त्यालाच माहित … पण या निर्णयामुळे नुकसान झालं ते संपूर्ण मुंबई इंडियन्सचे …

तुम्हाला काय वाटतं? हार्दिकला कर्णधार करून मुंबईने चूकच केली का? रोहित कॅप्टन असता तर मुंबई प्ले ऑफ मध्ये गेली असती का? मुंबईने अजून कोणत्या चुका केला? तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा