Mumbai Indians “प्ले ऑफ” ला जाणार कशी? पहा ‘ही’ 2 समीकरणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएलची चुरस अंतिम वळणावर आली असून प्ले ऑफ चे ४ संघ कोणते हे स्पष्ट होत आहे. आता ताज्या पॉईंट टेबल नुसार, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट या ३ संघानी प्लेऑफ मध्ये आपली जागा जवळपास फिक्स केली आहे. तर चौथ्या जागेसाठी रोहितची मुंबई इंडियन्स आणि विराटची रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात चुरस पाहायला मिळतेय. आज साखळी फेरीतील अंतिम २ सामने आहेत. अशा वेळी मुंबईचा संघ प्ले ऑफ साठी कसा पात्र ठरणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचेच नेमकं समीकरण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

समीकरण १ –

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने आत्तापर्यंत १३ सामन्यात ७ विजयासह १४ गुण मिळवले आहेत. मुंबई इंडियन्सला जर प्ले ऑफ मध्ये धडक मारायची असेल तर RCB ने त्यांचा शेवटचा सामना हरावा यासाठी प्रार्थना करावी लागेल. जर आरसीबी त्यांचा शेवटचा सामना हरली आणि दुसरीकडे मुंबईने हेंद्राबादवर विजय मिळवला तर प्ले ऑफ साठी मुंबईचा संघ पात्र होईल.

समीकरण २ –

मुंबई इंडियन्स साठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचा मायनस रन रेट… तर दुसरीकडे बंगळुरूचे रन रेट अतिशय चांगलं आहे. त्यामुळे समजा, RCB ने त्यांचा शेवटचा सामना अवघ्या १ धावांनी जरी जिंकला तरी मुंबईला हैद्राबाद विरुद्ध तब्बल 79 धावानी विजय मिळवावा लागेल, जे जवळपास अशक्य आहे. मुंबईने लखनौ विरोधात हातातील गमावलेला सामना महागात पडणार असच चित्र दिसत आहे.