व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

FD वर जास्त रिटर्न पाहिजे? ‘या’ बँका देत आहेत भरपूर व्याजदर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण FD ला प्राधान्य देतात. एकदा का FD केली कि त्यावर चांगलं व्याज सुद्धा मिळेल आणि आपला पैसा सुरक्षित सुद्धा राहील असं आपण मानतो. रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिलमध्ये व्याजदरात सातत्याने होणाऱ्या वाढीला ब्रेक लावला आणि रेपो दरात वाढ केली नाही. यानंतर काही बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात कोणतीच वाढ केली नाही. काही बँकांनी आरबीआयच्या धोरणाचे पालन केले असून व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत, अनेक ग्राहकांना जाणून घ्यायचे असते की त्यांना कोणती बँक FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार आहोत ज्यांनी या महिन्यात एफडी दरांमध्ये कोणतीच सुधारणा केली नाही किंवा व्याजदर वाढवले ​​किंवा कमी केले.

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेने सामान्य नागरिक, ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर व्याजदर वाढवले आहेत. PNB ने ठराविक मुदतीसाठी निवडक काही FD चे व्याजदर वाढवले ​​आहेत आणि काही ठराविक मुदतीच्या FD चे दर कमी केले आहेत. 444 दिवसांत पूर्ण होणाऱ्या FD वर, बँकेने नियमित नागरिकांसाठी व्याजदर 6.80% वरून 7.25% पर्यंत वाढवला आहे. त्याच वेळी, 666 दिवसांत पूर्ण होणाऱ्या एफडीवरील व्याज 7.25% वरून 7.05% पर्यंत कमी केले आहे. सध्या ही बँक 7.25% उच्च व्याज दर देत आहे.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदाने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही बँक सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिक 7.75 टक्के व्याज मिळवू शकतात. मुदत ठेवींवरील सुधारित व्याजदर 12 मे पासून लागू झाले आहेत .

कोटक महिंद्रा बँक

खाजगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने एका मुदतीच्या एफडीच्या व्याजदरात 50 आधार अंकांनी वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँक मुदत ठेव सामान्य नागरिकांसाठी 2.75% ते 7.20% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25% ते 7.70% दरम्यान व्याज दर देते. 390 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.20% व्याजदर आहे. 11 मे 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी सुधारित व्याज दर लागू होईल.

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर सर्वसामान्य नागरिकांसाठी 3% ते 7.10% (अमृत कलश ठेवीसह) दरम्यान व्याज दर देत आहे. SBI च्या अमृत कलश FD योजनेवर 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.10% दराने व्याज मिळत आहे. ही योजना 30 जून 2023 पर्यंत सुरु राहणार आहे आहे.

HDFC बँक

एचडीएफसी बँक 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर सर्व सामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 3% ते 7.10% दरम्यान व्याज देत आहे. यामध्ये, 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक 7.10% व्याजदर उपलब्ध आहे.

ICICI बँक

खाजगी क्षेत्रातील ICICI बँक देखील 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 3% ते 7.10% पर्यंत सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी व्याजदर प्रदान करत आहे. यामध्ये, 15 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक 7.10% व्याजदर आहे.