‘चॅम्पियन’ मुंबई इंडिअन्सने केलं नव्या जर्सीच अनावरण ; पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होणार आहे.आयपीएल चे सर्व संघ दुबई मध्ये पोचले असून काहींनी सरावाला सुरुवातही केली आहे. त्यामुळे आता सगळीकडे आयपीएलच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अशातच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे. नवीन जर्सीच्या अनावरणाचा एक खास व्हिडिओ मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये जयदीप गोहिल (हॅड्रोमॅन) हा पाण्यात मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी घालून डान्स करत आहे. या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की ‘ब्ल्यू. गोल्ड. आला रे!! अखेर प्रतिक्षा संपली आहे. पलटन ही तूमची नवीन जर्सी आहे.’

मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी नेहमीप्रमाणे निळ्या आणि सोनेरी रंग छटांमध्ये आहे. ही जर्सी हाताला आणि कॉलरला गडद निळ्या रंगाची आहे. तर पुढच्या आणि पाठीच्या बाजूला थोडी फिक्या निळ्या रंगाची आहे. त्याचबरोबर खांद्यावर सोनेरी रंग आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’