Mumbai Indians ने लॉन्च केली नवी जर्सी; पहा कशी दिसणार MI Paltan

mumbai indians
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स ने आपल्या महिला संघाची जर्सी लॉन्च केली आहे. या वर्षी पासून प्रथमच महिलांची आयपीएल सुरु करण्यात आली असून 4 मार्च पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मुंबईने आपली जर्सी लॉन्च केली आहे.

मुंबई इंडियन्स ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून याबाबत माहिती दिली. मेन्स टीम सारखीच हि जर्सी आहे मात्र या जर्सीचा रंग थोडा फिकट निळा आहे. मेन्स टीमची जर्सी डार्क निळ्या कलरची आहे. मुंबईच्या महिला संघाची ही जर्सी खूपच छान दिसत आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईचा पहिला सामना गुजरात जायंट्सविरूद्ध होणार आहे. मुंबईतील DY Patil स्टेडियम वर हा सामना होणार आहे.

असा आहे मुंबईचा संघ-

हरमनप्रीत कौर, नटालिया स्किवर, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, पूजा वास्त्रेकर, यस्तिका भाटिया, हीथर ग्रॅहम, अमनजोत कौर, धारा गुर्जर, सयका इशाक, क्लोन ट्रेयॉन, ह्युमरा कंडाम, प्रीना बला, प्रियंका बाला, इसाबेल वोंग, सोनम यादव, नीलम बिश्‍ट